Ashok Chavan : शरद पवार दोन दिवसांच्या सरकारसाठी पाठिंबा देतील, असं वाटत नाही !

Devendra Fadanvis : राजकीय फायदा उचलण्यासाठी या सगळ्या विषयाची चर्चा होत आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : पहाटेच्या शपथविधीच्या आधी आम्ही शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. यावर केवळ दिवसांच्या सरकारला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते पाठिंबा देतील, यावर विश्‍वास बसत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी नागपुरात आले असताना चव्हाण विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. सध्या राज्यात पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा उचलण्यासाठी या सगळ्या विषयाची चर्चा होत आहे. पण यातून त्यांना काहीही साध्य करता येणार नाही. पोटनिवडणुकांचेही निकाल त्यांना धक्का देणारेच असणार आहेत, असे ते म्हणाले.

बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयात इन्कम टॅक्सने हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनबाबत विचारले असता, या कारवाईवर आपला काहीही आक्षेप नाही. पण लोकशाही असलेल्या देशात माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. आजचं प्रकरण हे सर्च पुरते मर्यादित दिसते. त्यामुळे पुढे काही वेगळे घडले तरच यावर काही बोलता येईल, असे सांगताना तांबे प्रकरणात काही वाद नव्हता आणि काही असेलही तर तो आता संपलेला आहे, असे चव्हाण म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांना जरी वाटत असलं की सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमध्ये राहावं, तरी त्यांनी वेगळी भूमिका अगोदर घेतलेली आहे. पण बदलती परिस्थिती पाहता सत्यजीत तांबे यांना काय वाटतं, त्याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. त्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या बाबतीत निर्णय घ्यायला फार विलंब होत आहे. हा निर्णय तातडीने व्हायला पाहिजे होता. विलंब कशामुळे केला जात आहे, अशी चर्चा आता रंगली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Ashok Chavan
Marathwada : अशोक चव्हाण पण बोलले, त्यांच्याशी मी पुर्णत: सहमत..

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार येऊन सात-आठ महिने लोटले आहे. पक्षांतर बंदी कायद्याला हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम आहे, तो दूर करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्याची आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे अभ्यासू आहेत, यात वाद नाही. कुठला विषय केव्हा बोलायचा, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे अशी वक्तव्य ते वेळ साधून करतात, हे सत्य आहे. पोटनिवडणूक (By - Election) डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी कालचे वक्तव्य केले असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com