Ashok Jivtode News : ...आणि म्हणून ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला केला रामराम !

Chandrapur : सर्व ११ जिल्हे समृद्धी महामार्गाशी जोडण्याची गरज आहे.
Dr. Ashok JIvtode, Devendra Fadanvis, Chandrashekhar Bawankule and Sudhir Mungantiwar
Dr. Ashok JIvtode, Devendra Fadanvis, Chandrashekhar Bawankule and Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Dr. Ashok Jivtode left the Nationalist Congress : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक आणि विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (As many as 16 GRs were launched when Devendra Fadnavis was Chief Minister)

जनता महाविद्यालयाच्या मैदानावर काल (ता. २५) हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडत असल्याचे कारण त्यांनी सांगितले. मंचावर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणवीस, आमदार बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, संस्थेच्या अध्यक्ष प्रतिभा जिवतोडे होत्या.

..म्हणून जिवतोडे गुरूजींना आमदार व्हावे लागले !

चंद्रपूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे काम चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांनी केले. ते राजुऱ्याचे १९६७ ते १९७२ अपक्ष आमदार होते. आमदार होण्यामागचे खरे कारण वेगळे आहे. १९६३ साली संस्थेचा विस्तार होत असताना तत्कालीन सरकारने संस्थेचा रेकॉर्ड सील केला.

न्यायालयाचा नियंत्रक बसवण्यात आला. १९६३ ते १९८३ पर्यंत संस्थेवर नियंत्रक होता. त्या विरोधात लढण्याची जिद्द बाळगून जिवतोडे गुरूजी राजकारणात आले. पुढे राजकारण आणि समाजकारणात ते लोकप्रिय झाले, असे डॉ. जिवतोडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष पश्‍चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्या लोकांनी आजवर फक्त पश्‍चिम महाराष्ट्राचाच विकास केला. अन् विदर्भाकडे दुर्लक्ष केले. पण भारतीय जनता पक्षाने राज्यभर विकासाची कामे करताना विदर्भाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही, याशिवाय ओबीसींच्या विकासासाठीही सकारात्मक पावले भाजपने उचलली आहेत.

भाजपच्या राज्यात निघाले सर्वाधिक जीआर..

भाजपच्या विदर्भाबद्दल असलेल्या सकारात्मकतेमुळेच आज राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला असल्याचे डॉ. अशोक जिवतोडे म्हणाले. आपर्यंत ओबीसींसाठी जे २२ जीआर निघाले, त्यांपेकी तब्बल १६ जीआर हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निघाले, असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्हा 'समृद्धी'शी जोडला जावा..

ओबीसी आयोगाला सांविधानिक दर्जा देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये आमच्या मागणीवरून केले. समृद्धी महामार्ग नागपूरपासून मुंबईपर्यंत फडणवीसांनी केला. विदर्भातील काही जिल्हे या मार्गाला जोडले गेले, हे चांगले झाले. पण विदर्भात पूर्णपणे समृद्धी आणायची असेल तर सर्व ११ जिल्हे समृद्धी महामार्गाशी जोडण्याची गरज असल्याचे डॉ. जिवतोडे यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीला फडणवीसांना ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद दिला.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याला जेवढा जास्त विकास निधी खेचून आणता येईल, तो आणला आणि या जिल्ह्याचा विकास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. आता आम्हा ओबीसींची ताकत त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भाचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन भाजपमध्ये काम करणार असल्याचे डॉ. अशोक जिवतोडे (Dr. Ashok Jivtode) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com