Nagpur : आश्‍वासन जनतेच्या कामांचे, लक्ष्य ठेकेदारी; ZP सदस्यांची अशी सुरू आहे धडपड !

ZP Members : जिल्हा परिषदेत आलेल्या काही सदस्यांनी कंत्राटदारांसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
ZP Nagpur
ZP NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur ZP News : कोणत्याही निवडणुकीत उभा झालेला उमेदवार हा जनतेचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या सोडविण्याची आश्‍वासने देतो. जनतेचे हित सर्वतोपरी हे पटवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. पण एकदा निवडून आल्यावर दिलेली आश्‍वासने त्यांच्या लक्षात राहतातच, असे नाही. हाच अनुभव सध्या नागपूर जिल्हा परिषदेमध्ये येत आहे.

गत निवडणुकीत निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य जनतेच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत नाहीत, तर स्वहित करवून घेण्यासाठी कशी धडपड करीत आहेत, हे सध्या नागपूर जिल्हा परिषदेत बघायला मिळत आहे. याला काही सदस्य अपवाद असतीलही, पण सत्ताधाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त कामे कशी मिळवता येतील, यासाठी स्पर्धा सुरू झालेली बघायला मिळते. त्यातूनच जिल्हा परिषदेमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

ग्रामीण भागातील प्रश्न, समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना देऊन जिल्हा परिषदेत आलेल्या काही सदस्यांनी कंत्राटदारांसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. रद्द झालेल्या कामांना त्यांनी लक्ष्य केले असून नवीन कामे मिळविण्यासाठी धडपड सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून माजी मंत्री आमदार सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे.

पाचही पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. पहिल्यापेक्षा दुसऱ्या रेजिममध्ये एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यात कामे मिळणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कामे मिळण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचे काम होत आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या काळातील निविदा रद्द करण्याचा प्रकार हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगण्यात येते.

ZP Nagpur
ZP News: जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करा ; ग्रामविकास विभागाचे आदेश

काही सदस्यांना काम हवे असल्याने दुसऱ्याच्या माध्यमातून त्या निविदा रद्द करून घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याचाही यात हात असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेतील (ZP) सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले होते. सत्ताधाऱ्यांमध्येच कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून आहे. आता हे काम आपल्या माणसाला मिळविण्यासाठी सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

बांधकाम विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरण्यात येत असल्याचीही चर्चा होत आहे. काही सदस्यांनी कामेही मिळवून दिली. समाजाचे कल्याण (social welfare) करण्याच्या नावाने एका माजी पदाधिकाऱ्यांच्या धन्याने कंत्राटही नातेवाइकांच्या नावे मिळविली. पद जाण्यापूर्वीच कामासाठी आगाऊ रक्कमही काहींना दिल्याची चर्चा आहे. सर्वच विभागात हा प्रकार होत असल्याने अधिकारीही (Officers) वैतागले आहेत.

एक माजी महिला पदाधिकारी अद्यापही जुन्या कामात आहेत. मर्जीतील व्यक्तीस कंत्राट मिळवून देण्यासाठी काही सदस्यांची मोठी धडपड सुरू आहे. त्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनाही हाताशी धरण्याचे प्रयत्न आहे. पदाधिकाऱ्यांची सदस्यांना साथ मिळते की नाही, याकडेच अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com