Ayodhya Ram Temple : 20, 21 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिर बंद !

Lord Shri Ram will be installed : म्हैसूर निवासी अरुण योगिराज यांच्या मूर्तीची निवड
Shree Ram temple in Ayodhya
Shree Ram temple in AyodhyaSarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे

अयोध्येत रोज 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. ही गर्दी पाहता आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची व्यवस्था उभारणीसाठी जुन्या मंदिरातील दर्शनव्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत केवळ मंदिरातील पूजन, आरती, भोग, शयन फक्त पुजारी करतील.

16 जानेवारीपासून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे इतर पूजन व विधी सुरू होतील. म्हैसूरच्या अरुण योगिराज यांनी साकारलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापित होणार असल्याची माहिती अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (ता. १५) पत्रकारपरिषदेत दिली.

Shree Ram temple in Ayodhya
Ram Mandir : तेजप्रताप यादव यांच्या स्वप्नात श्रीराम आले अन् म्हणाले, 22 जानेवारीला...

कोण आहेत अरुण योगिराज ?

म्हैसूर येथील मूर्तिकार आहेत अरुण योगिराज. त्यांच्या पाच पिढ्यांनी मूर्ती निर्माणकार्यात जीवन व्यथित केले. राम मंदिर ट्रस्टच्या सर्व अकरा ट्रस्टींनी एकमताने मूर्तिकार अरुण योगिराज यांच्याद्वारे निर्मित झालेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला मान्यता दिली. अरुण योगिराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्य प्रतिमा तयार केली असून दिल्लीत इंडिया गेट सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा अरुण योगिराज यांनी घडविली आहे. अयोध्येतील मंदिर रामानंद परंपरेतून तयार करण्यात आले आहे. त्या परंपरेच्या आधारे मंदिर परिसर घडविला जात आहे.

ती मूर्ती गर्भगृहात राहणार...

प्रभू श्रीरामाच्या जुन्या मूर्तीचे काय, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर या प्रश्नावर आज चंपत राय यांनी फुल स्टॉप लावला. चंपत राय यांनी श्रीरामाची 1950 पासून असलेली प्रतिमा मूळ गर्भगृहात राहणार आहे. त्या प्रतिमेचे पूजन नित्यनियमाने होईल, असे स्पष्ट करीत सर्व प्रश्नांना विराम दिला.

महाराष्ट्रातील ‘या’ तीन गोष्टींचा अंतर्भाव...

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात महाराष्ट्रातील तीन गोष्टींचा समावेश राहणार आहे. देशातील सहा दर्शन परंपरेनुसार महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे लोक या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहतील, तर उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण वेळ मंगलवाद्य वादन होणार असून यात महाराष्ट्राच्या 'सुंद्री' या वाद्याचे वादन होईल. इतकेच नाही, तर नाशिक येथील गोदावरीचे जल प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आणल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

भाषण नाही मनोभाव...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा दुपारी 12.20 पासून 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. या वेळी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण राहणार नाही, तर ते मनोभाव प्रकट करतील, असेही चंपत राय यांनी सांगितले. श्रीराम मंदिर ट्रस्टचे नृत्य गोपालदासमहाराज आशीर्वाद यावेळी देतील. हा संपूर्ण सोहळा एक ते सव्वा तासाचा असेल.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

नेपाळ येथून एक हजार टोपल्यांमध्ये भेटवस्तू ...

दक्षिणी नेपाळ येथील वीरगंज येथून एक हजार टोपल्यांमध्ये ट्रस्टला भेटवस्तू प्राप्त झाल्या आहेत. यात सोन्या-चांदीच्या वस्तूंबरोबर अन्न, फळ, वस्त्र, मेवा यांचा समावेश आहे. सीतामाता यांच्या जन्मस्थान सीतामढी येथूनदेखील अशा स्वरूपाच्या भेटवस्तू मिळाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर रोज नवनवीन वस्तू मंदिराला प्राप्त होत आहेत.

53 देशांतून प्रत्येकी एका व्यक्तीचे दर्शन..

जगभरातील 53 देशांतून प्रत्येकी एका व्यक्तीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा व प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी आमंत्रित केले आहे. त्याचबरोबर 26 जानेवारीपासून विश्व हिंदू परिषद व संघ परिवार यांच्या कार्यकर्त्यांच्या दर्शनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत. साडेचार ते पाच हजार लोक दर्शनासाठी येतील. फेब्रुवारीअखेरपर्यंत ही व्यवस्था असेल. ज्या दिवशी भक्त अयोध्येत येतील, त्या दिवशी त्यांचे दर्शन होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची तयारी सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com