Bacchu Kadu : भविष्यवाणी करता आली, तर बघतो; असं का म्हणाले बच्चू कडू?

Court : न्यायालयात निर्णय भावनांवर होत नाही, तर कागदपत्रं, पुराव्यांच्या आधारांवर होतात.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अमर घटारे

Amravati Bacchu Kadu News : उद्या धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यांचं, यावर निर्णय होणार आहे. एकनाथ शिंदे यांची मजबूत तयारी आहे. परिपूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागू शकतो. पण शेवटी न्यायालयात निर्णय भावनांवर होत नाही, तर कागदपत्रं, पुराव्यांच्या आधारांवर होतात, असे शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

उद्या धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळेल, याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय लागणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, अशी भविष्यवाणी करता आली, तर बघतो की त्यासंबंधी काही ज्ञान मला घेता येते का. ‘चिन्ह काही येवढे महत्वाचे नाही. कारण मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो. सगळ्यात पहिले पतंग नंतर विमान त्यानंतर नारळ अन् मंग नारळ पयालं अन् कपबशी आली.’, असे आपल्या खास वऱ्हाडी शैलीत त्यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांना जेलमध्ये टाकणे चुकीचे आहे. एखादे काम व्हावे, म्हणून किंवा मागणी पूर्ण करवून घेण्यासाठी कुणी आंदोलन करतो. तर त्यालाच जेलमध्ये टाकण्यात येते. हे सर्वथा चुकीचे आहे. यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याला ते भोगावे लागेल. आम्ही अनेक आंदोलने केली. गुन्हे दाखल झाले, जेलमध्येही राहिलो. ही पद्धतच चुकीची आहे. असे बच्चू कडू रविकांत तुपकर यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल म्हणाले.

Bacchu Kadu
Sanjay Rathod : यांनी वाचलाच नाही अर्थसंकल्प, तर इंग्रजीतून मांडल्याने बच्चू कडू नाराज !

बुलढाणा (Buldhana) येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्याने रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यावर आमदार कडू (Bacchu Kadu) म्हणाले, हा सिस्टीमचा दोष आहे, कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असून यासाठी नव्याने कायदा आणण्याची आवश्यकता आहे, आंदोलन का करावं लागलं हे प्रशासन कधीच पाहत नाही.

ज्याच्यामुळे आंदोलन करावं लागलं, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं व आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हे चुकीचं आहे. ज्या शेतकऱ्यावर दंगलीचे गुन्हे लावले तर ठाणेदार व एसपीने लावले असतील, तर अधिकाऱ्याला ते भोगावे लागेल. वेळ आली तर आम्ही तिथे उपस्थित राहू, असेही बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com