Bacchu Kadu News : शिंदे-फडणवीसांच्या म्हणण्यावरून तेव्हा शांत झाले, पण बच्चू कडू - रवी राणा पुन्हा भिडणार?

Amravati : लोकसभा निवडणुकीपूर्वी हा संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

Amravati Lok Sabha Constituency News : प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू आणि अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष नवा नाही. एके काळी या दोघांच्या भांडणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्रस्त झाले होते. पण तेव्हा तोडगा निघाला. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी हा संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. (The conflict is likely to flare up again)

अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार ठरला आहे. प्रहारकडून संभाव्य उमेदवार म्हणून रवींद्र वैद्य यांच्या नावाची जोरदार चर्चा गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच आता राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेने २२ जागांची मागणी केली असतानाच आता मित्र पक्षांनी देखील जागांची मागणी केली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत १५ ते १६ जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. बच्चू कडू यांनी नुकताच हा दावा ठोकल्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा विरोधात रिंगणात उतरण्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बच्चू कडू यांचे अतिशय निकटवर्ती व विश्वासू म्हणून रवींद्र वैद्य यांची ओळख आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून रवींद्र वैद्य यांना खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे. सध्या बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे महायुतीत आहेत. असे असताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा ठोकल्याने बच्चू कडू विरुद्ध आमदार रवी राणा असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu News : बच्चू कडूंच्या प्रयत्नांना शिंदे-फडणवीस साथ देणार का?

मागील अनेक वर्षापासून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया रवींद्र वैद्य यांनी दिली आहे. त्यामुळे आता आमदार बच्चू कडू यांनी रवींद्र वैद्य यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर प्रहार विरुद्ध आमदार रवी राणा असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

नवनीत राणा त्यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून स्वतंत्र लढणार आहेत. पण मागील काळातील त्यांची वाटचाल बघता हाती कमळ घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास मोठा पेच निर्माण होणार आहे. नवनीत राणा यांना २०२४मध्ये आपली खासदारकी राखायची असेल तर त्यांनी कमळ हाती घेणेच योग्य राहील, असेही राजकीय जाणकार सांगतात. तसे झाले तरी बच्चू कडू यांचा स्वभाव बघता, ते माघार घेतील असे वाटत नाही. थोडक्यात काय तर येत्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू-रवी राणा संघर्ष अटळ आहे.

Bacchu Kadu and Ravi Rana
Amravati; BJP आणि Ravi Rana यांच्यात का वाजलं ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

कॉंग्रेसकडून आमदार वानखडे ?

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडे अमरावतीसाठी (Amravati) उमेदवार नाही आणि तो तयार करण्याची त्यांची इच्छादेखील दिसत नाही. जागा वाटपामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वाट्याला आहे. पण अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सुटण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे मविआकडून लोकसभा लढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अर्थातच यामध्ये माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची भूमिका महत्वाची असणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com