Bacchu Kadu News : बच्चू कडूंना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन शांत करण्याचा प्रयत्न, पण...

Maharashtra : शिंदे गटातील व भाजप समर्थक अपक्ष आमदारांची आशा जवळपास मावळली आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Amravati Bacchu Kadu and Ravi Rana News : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या शिंदे गटातील व भाजप समर्थक अपक्ष आमदारांची आशा जवळपास मावळली आहे. पण बच्चू कडू मात्र अजूनही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहेत. (Bachu Kadu, however, is still aspiring for a ministerial post)

राजकारणात कधीही काहीही घडू शकते हे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे म्हणणे केवळ स्वतः ला दिलासा देणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सत्तेच्या सरीपाटावर रविवारी (ता. दोन) मोठी राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपद बहालही करण्यात आले. शपथविधीस तिन्ही पक्षातील विधिमंडळ सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

शिवसेनेतून फुटून शिंदे गट सत्तेत सहभागी झाला तेव्हा या गटातील बंडात सामील झालेल्या काही आमदारांना मंत्रिपदाची आस होती. त्यांना वारंवार त्यासाठी आश्वासनही देण्यात आली व मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारीखही निघाल्या. त्यामुळे मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडणार या आशेने त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. जिल्ह्यातील दोन आमदारांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.

आमदार राणाही आहेत रांगेत..

माजी राज्यमंत्री बच्चू कडू व भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी मंत्रिपदासाठी आपापले घोडे दामटले होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्षपद व त्यास कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते मंत्रिपदाची आस बाळगून आहेत. भाजपच्या श्रेष्ठींची मर्जी कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ले करणारे आमदार रवी राणा मंत्रिपदाची फिल्डिंग लावून होते.

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे व भाजप यांपैकी कोणत्याच गटातील सदस्याला संधी दिली गेली नाही. पुन्हा विस्तार होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पण त्याचेही काही खरे नाही, असे सांगण्यात येत असल्याने मंत्रिपदाची आस लावून गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असलेल्या जिल्ह्यातील दोन्ही आमदारांची धाकधूक वाढली आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या आशा जवळपास मावळण्यात जमा झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर बच्चू कडू यांचे ‘राजकारणात (Politics) कधीही काहीही घडू शकते’ हे विधान स्वतः ला दिलासा देणारे ठरेल का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com