Bacchu Kadu
Bacchu KaduSarkar

भाजपच्या माजी मंत्र्याला धोबीपछाड देत बच्चू कडुंची बुलडाणा जिल्ह्यात एंट्री...

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात लढवलेल्या पहिल्याच निवडणूकीत दणदणीत विजय मिळवित दमदार एंट्री केली आहे.
Published on

बुलडाणा : आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आणि आपल्या अभिनव आंदोलनांसाठी ओळखले जात असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीमध्ये दमदार विजय मिळवित धडाकेबाच एंट्री केली आहे. भाजपच्या माजी मंत्र्यांना धोबीपछाड देत त्यांच्या प्रहार (Prahar) संघटनेने हा विजय मिळविला आहे.

कोरोना संसर्गाचे नियम पालन करत आज प्रशासनाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये बच्चू कडू यांना जोरदार एन्ट्री केली. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कडूंच्या प्रहार पक्षाला १२ जागांवर विजय मिळविता आला.

संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्यांनी माजी मंत्र्यांना जोरदार टक्कर दिली. आजी आणि माजी मंत्र्यांच्या गटामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत होते. त्याप्रमाणे आजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच येथील निवडणुकीत नशीब आजमवित 12 जागांवर विजय मिळविला आहे.

Bacchu Kadu
बच्चू कडू म्हणाले, औकात नसताना अशी तुलना करू नये…

काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला 5 जागा तर राष्ट्रवादी, भाजप आणि वंचितला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मतदार संघातील संग्रामपूर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्‍वास अनेकांना होता. परंतु, एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये प्रहार जनशक्तीकडे बहुमत असल्याने ते सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील आणि मतदार संघात भाजपच्या हातातून एक नगरपंचायत जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ताधारी आमदारांना फटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com