Bachchu Kadu: रंग बेरंग झाला...मुद्द्यावर बोला; बच्चू कडू यांचा सरकारवर 'प्रहार'

Maharashtra Politics: प्रत्‍येक मतदारसंघात ‘मी खासदार’अभियान राबवून ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्‍याची घोषणा बच्‍चू कडू यांनी यापूर्वी केली आहे. बच्चू कडू यांनी महायुतीविरोधात शड्डू ठोकला आहे.
Bachchu Kadu News
Bachchu Kadu NewsSarkarnama

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षात जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही ठिकाणी बंडखोरी होण्याचे चित्र आहे. अमरावती मतदारसंघातही (Amravati Lok sabha constituency 2024) महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. महायुतीचे घटक असूनही प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू (Bachchu Kadu) हे सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. धूलिवंदनानिमित्त सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी भिंती रंगवल्या आहेत. राज्यातील विविध समस्यांबाबत सरकारवर त्यांनी 'प्रहार'केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'निवडणूक आली मुद्द्यावर बोला'ही मोहीम बच्चू कडू यांनी राबवली आहे. त्यांच्या कुरळ पूर्णा येथील घराच्या भिंतीवर त्यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न मांडले आहेत. प्रत्‍येक मतदारसंघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्‍याची घोषणा बच्‍चू कडू यांनी यापूर्वी केली आहे. बच्चू कडू यांनी भाजपा आणि महायुतीविरोधात शड्डू ठोकला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना या भाजपकडून लढणार असल्याची माहिती आहे. पण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध केला आहे.

Bachchu Kadu News
Solapur News: मी सोलापूरची लेक, पुढील 40 दिवस याचं भान राखा! प्रणितींच्या शुभेच्छांचा सातपुते स्वीकार करणार का?

"आम्हाला विश्वासात न घेता मतदारसंघ जाहीर केले जात असतील तर अशा परिस्थितीत आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, पाठिंबा देण्याची मानसिकताच राहिली नाही. वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही अडचणीत येत असल्याचं वाटायला लागलं. वेळ आली तर आम्ही अमरावतीत उमेदवार देऊच, यावर बच्चू कडू ठाम आहेत.

नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली."मेळघाटातील आदिवासींना सलाम करतो, मानाचा मुजरा करतो. त्यांना खांद्यावर घेऊन नाचवले पाहिजे,' असे विधान करीत राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केल्याच्या प्रकरणाचा बच्चू कडू यांना समर्थन केले. "17 व 20 रुपयांची साडी वाटून नवनीत राणा या लोकशाहीचे पतन करीत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे," असे सांगत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे.

बच्चू कडू यांनी या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधलं आहे...

  • स्वामिनाथन आयोग पूर्णता स्वीकारावा. 50 टक्के नफा धरून भाव काढणे किंवा पेरणी ते कापणीपर्यंत सर्व मजुरीची कामे मनरेगामधून घ्यावे

  • पेपरफुटीचा कायदा तातडीने मंजूर करावा

  • शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ निर्माण करावे

  • दिव्यांग बांधवांना 3000 रुपये मानधन व 5 टक्के निधी केंद्र व राज्याचे बजेटमधून खर्च करावा..

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com