Bachchu Kadu News : नवनीत राणांच्या प्रचाराचा मंडप कोसळला; बच्चू कडू म्हणतात हनुमानजींनी लाथ मारली

Amravati Lok Sabha Constituency : अमरावतीतील सायन्सस्कोर मैदानावर सभेची परवानगी असतानाही बच्चू कडूंनी ऐनवेळी ती नाकारण्यात आली. यावरून भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा कडूंनी गंभीर आरोप केला आहे.
Navneet Rana, Bachchu Kadu
Navneet Rana, Bachchu KaduSarkarnama

Amravati Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांची भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती येथे बुधवारी (ता. 24) जाहीर सभा होत आहे. या सभेची संपूर्ण तयारी झालेली होती. मात्र, वादळवाऱ्याने सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला आहे. एकीकडे सभास्थळाच्या परवानगीवरून माजी मंत्री बच्चू कडू आणि पोलिस प्रशासनात वाद झाला, तर दुसरीकडे शाह यांच्या सभेसाठी उभारलेल्या मंडप कोसळला. यावरून कडूंनी भाजपसह राज्य सरकार आणि खासदार नवनीत राणा यांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे कडू आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. Bachchu Kadu attack on Navneet Rana.

अमरावतीतील सायन्सकोर मैदानावरून बच्चू कडू Bachchu Kadu आक्रमक झाले आहेत. मात्र याच मैदानावर अमित शाह यांच्या सभेची तयारी सुरू आहे. या मैदानावर सभेसाठी कडूंनी परवानगी घेतलेली आहे. मात्र, ऐन वेळी बच्चू कडूंना मैदानावर जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करत पोलिसांना धारेवर धरले. यातच शाह यांच्या सभेसाठी तयार केलेल्या सभामंडपाचा काही भाग वादळाने कोसळला आहे. यावर कडूंनी अप्रत्यक्षपणे नवनीत राणांवर Navneet Rana घणाघाती टीका केली.

बच्चू कडू म्हणाले, आज हनुमान जयंती आहे. हनुमानजींनी त्यांचे काम दाखवले आहे. एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांनी म्हटलेली हनुमान चालिसा चुकीची होती. त्यात राजकीय हेतू होता. आता त्यांची जबरदस्ती सुरू आहे, मात्र ती देवालाही मान्य नाही. यावर हनुमानजी म्हणतात की असे वागणे चालणार नाही. येथे कायद्याचे राज्य राहिलेले दिसत नाही. पोलिस अधिकारीही भाजपचे गुलाम असल्यासारखे बोलत आहेत, अशी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana, Bachchu Kadu
Bachchu Kadu News : अमरावतीत राजकीय नाट्य; सभेच्या मैदानावरून पोलिस अन् बच्चू कडूंमध्ये तुफान बाचाबाची!

मैदानावरून राणा-कडू आमनेसामने

अमरावतीतील प्रहारचे उमेदवार दिनशे बूब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडूंच्या वतीने सायन्सस्कोर मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी मिळालेल्या परवानगीनुसार कडू 24 एप्रिल रोजी तेथे सभा घेणार होते. मात्र, त्याच मैदानावर त्याच दिवशी गृहमंत्री अमित शाहांची सभा घ्यायचे ठरले. त्यानंतर भाजप सत्तेचा वापर करून हे मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला आहे. तसेच आमची नियोजित सभा होणार असून, त्यासाठी 23 एप्रिलपासूनच मैदान ताब्यात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Navneet Rana, Bachchu Kadu
Rohit Pawar News : पार्थ पवारांच्या मागे-पुढे दोन रणगाडे द्यावेत; रोहित पवार नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com