Bachchu Kadu VS Sudhir Mungantiwar : वाघनखांवरून बच्चू कडूंनी डिवचले, मग मुनगंटीवारांनी त्यांना आडव्या हाताने घेतले !

Sudhir Mungantiwar : बच्चू कडू यांना सुधीर मुनगंटीवार यांनीही आडव्या हाताने घेतले आहे.
Bacchu Kadu and Sudhir Mungantiwar
Bacchu Kadu and Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना यात सत्तेत सहभागी असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर राज्यमंत्री दर्जा असलेल्या बच्चू कडू यांनीच टीका केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Surprise is being expressed because Bachu Kadu criticized)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ‘सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला.

"५०-६० लाख रुपये खर्च करून सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला गेले आणि रिकाम्या हाताने परतले, ही बाब मला आवडली नाही", असं बच्चू कडू म्हणाले. "हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिजिटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तिशः जातात आणि रिकाम्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत”, अशी तीक्ष्ण टीका करायलाही बच्चू कडू यांनी मागेपुढे पाहिले नाही.

बच्चू कडू यांना सुधीर मुनगंटीवार यांनीही आडव्या हाताने घेतले आहे. एक व्हिडिओ प्रसारित करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील. कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला २५ कोटींचा खर्च होतो.

२० वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं.” अनेक वर्षे आमदार राहिलेल्या बच्चू कडू यांच्या ज्ञानावरही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत म्हटले की, “खरं तर, अशाप्रकारे ऑनलाइन एमओयू करता येत नाही, हे कदाचित त्यांना माहीत नसेल. अनेकदा आमदार विधिमंडळात निवडून येतात, पण माहितीच्या अभावी ते अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत असतात.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आता बच्चू कडू यांनीही या मुद्द्यावर 'प्रहार' करण्याचा प्रयत्न केल्याने सत्ताधारी दोन नेत्यांमधील कडवटपणा वाढणार की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदे गटाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेत. परंतु आता त्यांनी भाजपच्या सर्वात अनुभवी व ज्येष्ठ नेत्यावर जाहीर टीका केल्याने या प्रकरणाला कोणते वळण लागते, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Atul Mehere

Bacchu Kadu and Sudhir Mungantiwar
Mungantiwar News : भारत-पाक सीमेवर छत्रपतींचा पुतळा; मुनगंटीवार म्हणाले शासन मदत करणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com