Violence in Beed : बीडमधील हिंसक आंदोलनाची झळ उपराजधानी नागपुरातही

Expressed Protest : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाकडून हल्ल्याचा निषेध
Protest in Beed
Protest in BeedGoogle

Backlash in Nagpur : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर काहींनी हल्ला चढवला. जमावानं त्यांचा बंगला जाळला तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली. याबाबात संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असंही आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं. या घटनेचे पडसाद आता उपराजधानी नागपूर येथेही उमटले आहेत.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांच्या घरावरदेखील हल्ला झाला. क्षीरसागर यांचं संपूर्ण कुटुंब त्यावेळी घरातच होतं. या घटनेनंतर बीडसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. बीडमधील या घटनेचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाने निषेध नोंदविला आहे. (Backlash in Nagpur against attack on Sharad Pawar group MLA Sandeep Kshirsagar's house in Beed)

आमदार क्षीरसागर यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे नंदकिशोर दंडारे व ईतर पदाधिकारी म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे तेली समाजातील प्रतिष्ठित नेते आहेत. त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येतो. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तेली समाजाच्या नेत्यांची घरं, कार्यालय आणि प्रतिष्ठानांना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं एखाद्या आंदोलनाच्या आडून जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्रातील तेली समाजाकडून व्यक्त होत आहे. सरकारनं यासंदर्भात तत्काळ कारवाई न केल्यास तेली समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचा किंवा कोणत्याही तेली समाज नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. यामुळे मराठा समाजालाही त्यांचे हक्क मिळतील व ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही. तेली समाज हा ओबीसी समाजातील ४०० जातींपैकी दुसरा सर्वांत मोठा समाज आहे. सरकारनं आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून घेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी तेली समाजानं केली आहे.

संदीप क्षीरसागर यांच्या घरावरील हल्ल्याच्या प्रसंगात राज्यातील तेली समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अशा आंदोलनांच्या आडून हल्ला करणाऱ्या समाजकंटकांनी पोलिसांनी तत्काळ हुडकून काढावं, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पुनश्च देण्यात आलाय.

(Edited By : Atul Mehere)

Protest in Beed
Nagpur Kunbi-OBC Agitation : `या` कारणामुळे आता सरकारला करावी लागणार तारेवरची कसरत !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com