Balapur Former MLA News : माजी आमदाराला मोह सुटेना, ‘माजी’ऐवजी फक्त ‘मा’ लिहिले; स्टिकर प्रेम कायम !

Former MLA : या माजी आमदारांचे स्टिकर प्रेम कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
Akola former MLA's Car
Akola former MLA's CarSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : आमदारकी गेल्यावरही 'आमदार स्टिकर'चा मोह न सुटलेल्या एका माजी आमदाराने आपल्या वाहनावर अशोक स्तंभ असलेले विधानसभा सदस्याचे स्टिकर लावले. याची बातमी 'सरकारनामा'ने दिली होती. माजी आमदाराने 'स्टिकर' न काढता स्टिकरवर आता 'मा.’ लिहून आमदार असल्याचं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. (The discussion that the sticker love of former MLAs is still alive)

या माजी आमदारांचे स्टिकर प्रेम कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते बळीराम सिरस्कार यांनी आपल्या वाहनावर 'विधानसभा सदस्य' लिहिलेले अशोक स्तंभाचे स्टिकर लावले आहे. गाडीवर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ असलेले स्टिकर लावणे म्हणजे बेकायदेशीरच. मात्र, हे सध्या आमदार जरी नसले तरी गाडीवर 'अशोक स्तंभ' लावून फिरत आहेत.

हीच बातमी काही दिवसांपूर्वी 'सरकारनामा'ने देताच बातमीची दखल घेत बळीराम सिरस्कार यांनी 'स्टिकर' न काढता. त्याच स्टिकरवर विधानसभा सदस्य शब्दाच्या पूर्वी 'मा.' लिहिले. पण माजी आमदार असे स्पष्ट न लिहिता केवळ ‘मा.’ लिहून आमदार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. सिरस्कार यांना 'सरकारनामा'च्या बातमीची दखल घ्यावी वाटली. मात्र, या माजी आमदाराने 'स्टिकर'चा मोह का सोडला नाही, असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.

'मा.' म्हणजे 'माजी' की 'माननीय' !

'सरकारनामा'च्या बातमीनंतर माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपल्या गाडीवर असलेल्या 'अशोक स्तंभ' असलेल्या स्टिकरवर 'विधानसभा सदस्य' या शब्दाच्या पूर्वी लहान अक्षरात 'मा.' लिहिलं. तर लाल अक्षरात लिहिले असलेल्या 'आमदार' या शब्दापूर्वीही 'मा.' लिहिले. 'मा.' म्हणजे 'माजी' आमदार असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आता हे 'मा.' म्हणजे नेमके माजी की 'मा.' म्हणजे माननीय, अशी चर्चा आता यानिमित्ताने रंगली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार 'मा.' म्हणजे माननीय असंच म्हटलं जातं.

'राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ' वाहनावर लावणे बेकायदेशीरच!

अनेक जण आपल्या वाहनावर 'अशोक स्तंभ' असलेल्या राष्ट्रीय चिन्हाचा सर्रासपणे वापर करतात. भारतीय राष्ट्रचिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचे स्टिकर गाडीवर लावणे, हे एक प्रकारे व्हीआयपी संस्कृती झाली आहे. मात्र, हे 'बेकायदेशीर'च आहे. अशोक स्तंभांचा वापर कुणी करावा, यासंदर्भात केंद्र सरकारने लागू केलेल्या २००७ च्या अधिसूचनेमधील शेड्यूल दोननुसार मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.

खासदार, आमदारांसह, माजी आमदारांच्या वाहनांवर सर्रासपणे हिरव्या रंगाचे स्टिकर दिसते. या हिरव्या रंगाच्या स्टिकरवर अशोक स्तंभाच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात येतो. हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे 'या' स्टिकरवर 'मा.' जरी लिहिले तरी ते बेकायदेशीरच आहे.

Edited By : Atul Mehere

Akola former MLA's Car
अकोल्यात पवारांची दणक्यात एन्ट्री | Sharad Pawar at Akola

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com