Balu Dhanorkar News : तेव्हा बाबासाहेबांनी जातिवादाला जोरदार टक्कर दिली होती, आणि आज...

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. आंबेडकर यांनी समतेचे राज्य प्रस्थापित केले होते.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi Meeting News : भांडवलशाही सरकारच्या काळात देशात बेबंदशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरू आहे. ही सत्ता उलथवून फेकण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने नागपुरात उद्या विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना कमजोर करणाऱ्या सरकारची लक्तरे वेशीवर या सभेत काढली जाणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. (The possibility of conflict between castes and religions cannot be ruled out.)

वज्रमूठ सभेतून लोकशाही संविधान आणि देशाची एकता आणि अखंडता या साठी महाविकास आघाडीच्या सोबत वज्रमुठीप्रमाणे एकसंघ राहण्यासाठी ही सभा आहे. देशात कट्टरतावादी सरकारची उतरती कळा सुरू झाल्याने त्यांच्याकडून जाती-जातींमध्ये, धर्माधर्मांत भांडणे लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) चंद्रपूर (Chandrapur) येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सध्या देशात जातीयवादाचे राजकारण सुरू आहे. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिवादाला जोरदार टक्कर देऊन समतेचे राज्य प्रस्थापित केले होते. आज संविधान धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ अधिक घट्ट करण्यासाठी देशभरातील इतर राजकीय पक्ष एकत्र येत आहे, असे खासदार धानोरकर म्हणाले.

ज्या बाबासाहेबांना या देशात वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर या भारत देशाचा पूर्ण राज्यकारभार चालतो. स्वतंत्र भारतात बाबासाहेबांकडे कायदे मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि जलसंधारण हे तीन खाते होते. तेव्हा कामगार नेते या नात्याने बाबासाहेबांनी सर्वच कामगारांवर फार मोठे उपकार केले आहेत.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा नष्ट करायचा आहे...

पूर्वी अधिकारी असो किंवा कर्मचारी असो प्रत्येकाला तब्बल १४-१४ तास काम करावे लागत होते. परंतु बाबासाहेबांनी त्या चौदा तासाचे फक्त आठ तास केले. इतकंच नव्हे तर आठवड्यातून एक सुट्टी मिळावी, यासाठी त्यांनी तरतूद करून ती मिळवून दिली. त्यासोबतच जलसंधारण मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) नदीजोड प्रकल्प ही संकल्पना ७० वर्षांपूर्वी मांडली होती.

ही योजना प्रभावीपणे राबविली असती तर बाराही महिने देशातील (India) देशभरात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असते. बाबासाहेबांच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्प प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com