Bawankule : पवारांच्या कार्यक्रमात मोदी गेलेले आहेत, पटेलांकडे फडणवीस गेले तर नवल काय !

Maharashtra : हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे टिका करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
Prafull Patel, Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis.
Prafull Patel, Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. त्यावरून आता बाऊ केला जातोय. पण हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे टिका करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, शरद पवारांच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीही यापूर्वी गेलेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात फडणवीस गेले आहेत आणि जाणारही आहेत. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. सकाळचा नऊ वाजताचा भोंगा बंद झाला तर ही संस्कृती नक्कीच जगता येईल आणि वाढवताही येईल. त्यामुळे अशा गोष्टीत कुणी फार डोकं लाऊ नये. असा सल्लाही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळी येथील सभेत लोक नव्हते, खुर्च्या उचलाव्या लागल्या, असे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांची सभा भव्य झाली. खुर्च्या उचलाव्या लागल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांना चांगले समर्थन मिळत आहे. टिका करणाऱ्यांना करू द्या, सरकार आपले काम करीत आहे. ‘शरद पवार आजच्या काळातील शाहू महाराज’, असे विधान हरी नरके यांनी केले. यावर बोलताना हरी नरके विद्वान आहेत, जगातील सर्वात विद्वान तेच आहेत, हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले, असे बावनकुळे म्हणाले.

काल अर्थसंकल्पासंदर्भात बैठका होत्या. मात्र फडणवीसांच्या कालच्या कार्यक्रमाबद्दल मला माहिती असे सांगत बावनकुळेंचे निवासस्थान असलेल्या कोराडी येथील मंदिरात अनेक विकास कामे होत असल्याचे ते म्हणाले. कल्चरल सेंटर बांधलेले आहे. देशातील एकमेव कल्चर सेंटर, रामायण भवन बांधण्यात आले आहे. भाविकांना सुविधा मिळाव्या, देशभरातील शक्तिपीठ तिथे उभारली जाणार आहेत. भाविकांना तिथे शक्तिपीठांचे दर्शन होणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी दिल्याचे ते म्हणाले.

Prafull Patel, Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis.
Beed News : एडीट करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात बावनकुळे करणार कडक कारवाई!

भाजपमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवतो. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत. आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. ज्यांची घरे मातीची झाली आहेत. मातीच्या घरी कोणी राहायला तयार नाही. म्हणून लोक आमच्याकडे राहायला येतात. आम्ही त्यांना थांबवत नाही. आम्ही मात्र कोणाच्या घरात जात नाही.

Prafull Patel, Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis.
CM Fellowship Program : शिंदे-फडणवीस सरकारसोबत काम करायचं ? ; तर मग हे वाचाच

आम्ही कोणालाही ऑफर देणार नाही. आमच्या पक्षात या, असा निमंत्रण देणार नाही. मात्र भाजपमध्ये (BJP) कोणीही आले, तर त्यांचे स्वागतच करू. त्यांच्या पक्षात जेवढा सन्मान आहे, त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये देऊ. स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत असे पक्षप्रवेश होत राहणार. २०२४ मध्ये एवढे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट होणार आहेत की, त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना उमेदवार मिळणार नाही.

१० तारखेला ठाण्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. शरद पवारांच्या (Sharad Pawar) विदर्भ दौऱ्याबाबत विचारले असता, शरद पवार विदर्भात येत आहेत. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. दौरा करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र सर्वांसाठी खुला आहे. त्यावर मी काही बोलावे, असे नाही, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com