Bawankule News : स्वातंत्र्यवीरांच्या गावातून बावनकुळे गरजले; म्हणाले, एवढी ‘त्यांची’ उंची नाही !

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त होऊन असे वक्तव्य करत आहेत.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray and Devendra Fadanvis
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Bawankule News : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील वडोदा या गावात आहेत. भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत ते येथे मुक्कामी आहेत. याच गावातून आज (ता. 10) त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलावे एवढी त्यांची उंची नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना खडसावले.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ज्या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हाच त्यांनी हक्क गमावला होता. उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त होऊन असे वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे दौऱ्यावर असतात, तेव्हा तेथे लोक नसतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघामध्ये जेव्हा मुक्कामी होते, त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी झाली.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray and Devendra Fadanvis
Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या बाजूने, बावनकुळे बघा काय म्हणाले ?

काटोलमध्ये फडणवीस आले तेव्हा त्यांचे स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं. तेव्हा त्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावर राष्ट्रपती राजवट त्यांनी तेव्हाच लागू करायला पाहिजे होती, जेव्हा पिशव्यांचा घोटाळा झालेला होता, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संतोष बांगर यांनी मते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी राहण्याचा सल्ला दिला. याबाबत विचारले असता, संतोष बांगर काय बोलले, ते मला माहिती नाही. पण कुणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. पुण्यात जी घटना घडली ती घडायला नको होती. या घटनेमध्ये ज्यांचा दोष आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पण निखिल वागळे यांनीदेखील बोलताना जरा तारतम्य बाळगले पाहिजे. निखिल वागळे एके काळी पत्रकार होते. पण आता ते यू ट्यूबवर काहीही बोलत असतात. ते का पक्षाचे प्रवक्ते आहेत, असा घणाघात आमदार बावनकुळे यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत वडोदा हे स्वातंत्र्यवीरांचं गाव आहे. येथे आम्ही अभियान राबवत आहोत. भाजपचे 50 हजार कार्यकर्ते अभियानासाठी निघालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना केल्या, त्याची माहिती देण्यासाठी गावात जाऊन मुक्काम करतो आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत आणि इतर योजना आहेत, त्याची माहिती पोहोचवत आहोत.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com