Bawankule on Jarange Patil : सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतील, बावनकुळेंना विश्‍वास !

Rahul Narvekar : नियमांप्रमाणे आणि कायद्याचा अभ्यास करूनच ते निकाल देतील.
Jarange Patil and Chandrashekhar Bawankule
Jarange Patil and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nagpur Political News : मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे, आजच्या बैठकीचे निमंत्रण मलासुद्धा आहे. मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळेल, असा मला विश्वास आहे. कारण आजची बैठक सर्वपक्षीय आहे. त्यामुळे तोडगा निघेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (He will give judgment only after studying the rules and law)

आज (ता. ११) सकाळी नागपुरात बावनकुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला. अपात्रतेच्या संदर्भात १४ सप्टेंबरला निर्णय होणार आहे. यासंदर्भात विचारले असता, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उत्कृष्ट वकील आहेत. त्यामुळे नियमांप्रमाणे आणि कायद्याचा अभ्यास करूनच ते निकाल देतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काल (ता. १०) जळगावच्या भाषणावर विचारले असता, राजकारणाच्या काही मर्यादा असतात, त्या पाळल्या पाहिजेत. ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळत चालली आहे. आता भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे, ते काय करतील हे सांगता येत नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था तोडणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होईल आणि जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेतील, असा विश्वास आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) व्यक्त केला.

Jarange Patil and Chandrashekhar Bawankule
Bawankule On Pawar : पवारांनी ‘त्या’ बाबी सर्वोच्च न्यायालयात का मांडल्या नाही? या स्थितीसाठी ४० वर्षांपूर्वीचे नेते जबाबदार !

तातडीने मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी जनतेची इच्छा आहे, आता नागपूरचे अधिवेशन होणार आहे, त्यात चांगले निर्णय होतील. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विकासाची चर्चा करायचीच नाही. दोघेही उठसूट आरोप करतात. काँग्रेसला कॅन्सर झाला आहे. संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे काम आहे. आता जनता त्यांना धडा शिकवेल.

राहुल गांधी यांच्याबाबत विचारले असता, राहुल गांधी वारंवार विदेशात का जातात, हा संशोधनाचा विषय आहे. कारण दर महिन्याला ते विदेशात जातात. पुढच्या वेळी विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा त्यांचे शेड्यूल त्यांनी जनतेला सांगावे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com