Bawankule On Mahavikas Aghadi : बावनकुळेंनी सुनावले, वैधानिक मंडळ बंद करणाऱ्यांनी बोलूच नये...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे किती लक्ष दिले?
Chandrashekhar Bawankule, Nana Patole, Uddhav Thackeray and Sharad Pawar.
Chandrashekhar Bawankule, Nana Patole, Uddhav Thackeray and Sharad Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : विदर्भ आणि मराठवाड्याच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही प्रदेशांतील अनेक प्रश्न आतापर्यंत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. आता राज्यात ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आहे. सरकारमधील तीनही नेते विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहे. (How much attention Uddhav Thackeray gave to Vidarbha and Marathwada)

काम करणाऱ्या सरकारबाबत उगाच कुणी कोल्हेकुई करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला आमदार बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे किती लक्ष दिले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे (UIddhav Thackeray) यांच्या काळात विदर्भ (Vidarbha)मराठवाड्यातील (Marathwada) वैधानिक मंडळं बंद करण्यात आली होती. त्यावेळी या दोन्ही प्रदेशांवर होणारा अन्याय कुणाला दिसला नाही का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भ व मराठवाड्यावर सर्वाधिक अन्याय झाला आहे. या भागांचा अनुशेष वाढला आहे. सध्या सत्तेवर असलेले राज्य सरकार हा अन्याय व अनुशेष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

मराठवाड्यासाठी घेण्यात येणारी बैठक कोणत्या ठिकाणी होत आहे, यावर वायफळ चर्चा करण्यापेक्षा त्यातून काय निष्पन्न होते, हे बघणे महत्त्वाचे आहे. विदर्भ व मराठवाड्यातील अनेक समस्या असताना महाविकास आघाडीला सत्तेवर अशी विशेष बैठक घेण्याचे शहाणपण का सुचले नाही, अशी विचारणा आमदार बावनकुळे यांनी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे समाजांमध्ये फूट पाडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारचे प्रामाणिक प्रयत्न कायम आहेत. ओबीसी समाजाचा हक्क डावलून कोणत्याही समाजाला आरक्षण द्यावे, या मताचे आपण नाही. परंतु विरोधकांजवळ आता कोणतेही मुद्दे उरलेलेच नसल्याने ते सामाजिक एकोपा बिघडविण्याचे प्रयत्न करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

‘इंडिया’ आघाडीने पत्रकार, प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार नवीन नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी हाच प्रकार केला होता. माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंदी घातली. पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. त्यांचा हा कित्ता ‘इंडिया’ आघाडीने गिरवला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. लोकशाहीत प्रसार माध्यमांवर असे दडपण आणणे म्हणजे शरमेची बाब असल्याचेही आमदार बावनकुळे यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Chandrashekhar Bawankule, Nana Patole, Uddhav Thackeray and Sharad Pawar.
ठाकरेंनी मर्यादा ओलांडल्या, बावनकुळेंचा इशारा | Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com