Nagpur Political News : आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या मागणीचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे कुणी थांबवलं होतं, असे म्हणत बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. (Bawankule lobbed questions at the leaders of Mahavikas Aghadi)
नागपुरात आज (ता. ४) आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, त्यांच्या काळामध्ये का विशेष अधिवेशन घेतलं नाही? अडीच वर्षे त्यांना कोणी कोणी थांबवलं होतं? उद्धव ठाकरे यांना कोणी थांबवलं होतं? अडीच वर्षे त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला का जाग आली नाही, आदी प्रश्न बावनकुळेंनी केले. मराठा समाजाला ही माहिती नाही की, कोण त्यांना आरक्षण देऊ शकत. शिंदे-फडणवीस सरकारच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते.
सरकारने (State Government) आपली भूमिका कालच (ता. ३) स्पष्ट केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पण कालच स्पष्टपणे सांगितले आहे. पण विरोधी पक्षाच्या हाती कोलीत लागलेले आहे. मराठा समाजाचे आंदोलन योग्य आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे. चौकशी केली पाहिजे, हे मान्यच आहे.
समाजासाठी आंदोलन करताना कुणीही लाठीचार्ज करू नये. कोणत्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे, समिती आपला निर्णय देईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सकारात्मक पावले उचललेली आहेत.
कोणत्या कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजाला न्याय देता येतो, हे एकदा थोडं तपासून घेतलं पाहिजे. यासंदर्भातील सर्व नियम तपासले पाहिजे. सगळ्या बाबी तपासल्या पाहिजे. नाहीतर कोणीही उठेल आणि कोर्टात जाईल आणि पुन्हा मराठा समाजाचे आरक्षण मागे पडेल.
मराठा समाजाचे आरक्षण मागे पडू नये, यासाठी सरकारने नियम पाळले पाहिजे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सक्षम नेते आहेत. योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाचा ते घेतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विरोधी पक्ष नेत्यांनी आंदोलनस्थळी गेले पाहिजे. विरोधी पक्षनेते आणि सरकारमधील नेत्यांनी आपापली बाजू मांडून एकत्रित काय निकाल होईल आणि मराठा समाजातील लोकांना न्याय द्यायचा असेल, तर एकत्रितपणे काम केले पाहिजे. सत्ताधारी, विरोधक आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.