Chandrashekhar Bawankule News: आम्ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जनतेसाठी विकास केला पाहिजे !

महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nagpur News : लहानपणापासून माझे जे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी रंगपंचमी साजरी करत असतो, आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज होळीच्या दिवशी बावनकुळेंनी त्यांच्या गावी कोराडी येथे होळीचा सण सहकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत साजरा केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार बावनकुळे म्हणाले, आजच्या दिवशी महाराष्ट्रातसुद्धा सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्वच स्तरावरचे मतभेद आणि मनभेद दूर करून महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. (How will Maharashtra progress in terms of development?)

मी विरोधकांनासुद्धा विनंती करतो की, आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. आमची नेहमीच त्यांना साथ राहिल.

होळीच्या पूर्वसंध्येला अवकाळ पावसाने पुन्हा विदर्भ, मराठवाड्या हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखी अतोनात नुकसान झाले. याबाबत विचारले असता, उद्या विधान परिषदेमध्ये सरकारला विनंती करणार आहे की, आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे, त्यामुळे त्यांना मदत मिळावी, यासाठी मी भारतीय जनता पक्षाकडून सरकारला त्यांना मदत देण्यासंदर्भात विनंती करणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Bawankule : शरद पवारांनी कदाचित तीन राज्यांमधील निवडणुकीचे निकाल पाहिले नसावे !

अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात पुढच्या काळात होणार आहेत. राजकारणात आमचं कामच आहे पक्षाला मोठं करणं. प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्याची माझी जबाबदारी आहे, आजच्या दिवशी नाना पटोले आणि इतर सर्व पक्षाचे अध्यक्ष यांनी मतभेद आणि मनभेद विसरून महाराष्ट्रासाठी काम करण्याची गरज आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिपादित केली.

टोकाचं जे राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासाने पुढे गेला पाहिजे, आम्ही आज आमच्यापासून ही सुरुवात करत आहे सर्व राजकीय पक्षांनी साथ द्यावी, महाराष्ट्राच्या जनतेला सरकारकडून विकास अपेक्षित आहे. तो अपेक्षित विकास आम्ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जनतेला दिला पाहिजे, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. याबाबत विचारले असता, संजय राऊत साहेबांनी उद्यापासून कुठलेही मनभेद आणि मतभेद न ठेवता आमच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे, अस आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com