Bawankule : फडणवीस बजेट वाचत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांचे चेहरे पडले होते !

Fadanvis : अजून माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलेन.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Earthquake is going to hit the state : पक्ष प्रवेशाच्या भुकंपाचे मोठे धक्के राज्यात बसणार आहेत. आमचे सरकार म्हणजे ‘बोलाची कढी’ नाही. तोंडावाटे केवळ वाफ काढण्याचे काम आम्ही करत नाही. ‘सामना’ला अर्थसंकलप कळतो का, सामनामध्ये लिहिणाऱ्याने कधी निवडणुका लढल्या आहेत का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज नागपुरात आमदार बावनकुळेंनी संवाद साधला. ते म्हणाले, एससी, एसटीकरिता ज्या सवलती असतील त्यासाठी पर्याय पाहिले जात असतील, पण ही सवलत इतर समाजालादेखील मिळणे आवश्यक आहे. मी याची अजून माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलेन. उद्धव ठाकरे गट प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन करणार आहे, तेसुद्धा फुसका बार ठरणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Bawankule : शरद पवारांनी कदाचित तीन राज्यांमधील निवडणुकीचे निकाल पाहिले नसावे !

सत्तेत असताना शेतकऱ्यांना काही दिलं नाही आणि आता आंदोलने करत आहेत. शिंदे-फडणवीस जोडी धनाजी-संताजीची जोडी आहे. दमदार काम करत आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता, सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत काम करण्याचे आमचे संस्कार आहेत. उद्धव ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले. त्यांनी आम्हाला सांगू नये, असे बावनकुळे म्हणाले.

अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील सरकारपेक्षा आमचं सरकार दुपटीने मदत करेल. देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट अर्थसंकल्प दिला. विदर्भाला शिल्लक निधी मिळाला. मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पांना निधी मिळाला. महाविकास आघाडीने विदर्भाला सापत्न वागणूक दिली. विदर्भातील क्रीडा मंत्री असताना निधी मिळत नव्हता. आता १०० कोटी रुपये विभागीय क्रीडा संकुलासाठी मिळाले आहेत. संतांची भूमी असल्याने तीर्थक्षेत्राला मोठा निधी मिळाला.

धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना २४ तास वीज आणि पाणी मिळेल यासाठी तरतूद बजेटमध्ये आहे. २०२४-२५ चा अर्थसंकल्प यापेक्षा चांगला असणार आहे. असं कुठलच क्षेत्र नाही, की ज्यासाठी बजेटमध्ये तरतूद नाही. शिवाजी महाराजांच्या काळातील नीतीचे दाखले यात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या बजेटमधून दिसत आहेत. रोजगार निर्मिती करणारा हा बजेट आहे, असे बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) सांगितले.

राज ठाकरेंबाबत (Raj Thackeray) विचारले असता, राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही. बजेट सुरू असताना विरोधी पक्षाच्या आमदारांचे चेहरे पडले होते. त्यांना पश्चात्ताप होत असल्याचं दिसतं होत. सत्तेपासून पैसा, पैशातून सत्ता हेच त्यांचं ध्येय होत. पण शिंदे-फडणवीस (Devendra Fadanis) सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांदेखील विचार करू लागले आहेत. येत्या १४ तारखेला भाजपमध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com