Bhandara-Gondia News : ‘सारस’ करणार अवैध धंद्यांची पोलखोल, मुनगंटीवारांच्या ट्विटनंतर सुरू झाली चर्चा !

Sudhir Mungantiwar : सॅटेलाईट टॅगिंगने भंडारा, गोंदिया जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली जाणार.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Bhandara-Gondia Districts Illegal businesses News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत आढळणारा सारस पक्षी हा येत्या काळात भंडारा गोंदिया जिल्हा प्रशासनाची पोलखोल करणार आहे. लवकरच वन विभागाद्वारे सारस पक्ष्याचे सॅटेलाईट टॅगिंग केले जाणार आहे. जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व अवैध धंदे त्यामुळे उघडकीस येणार आहेत. (The administration of Bhandara-Gondia district will soon be seen in the 'bad book')

विशेष म्हणजे या सॅटेलाईट टॅगिंगवर मंत्रालयाची थेट नजर राहणार असल्याने भंडारा आणि गोंदिया जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगलेली पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे स्वतःला राज्य सरकारच्या ‘गुड बुक’मध्ये पाहणारे हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचे प्रशासन लवकरच ‘बॅड बुक’मध्ये आलेले दिसतील.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत आढळणाऱ्या सारस पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्याकरिता न्यायालयानेदेखील वन विभागाला फटकारले आहे. ही बाब लक्षात येताच सारस संवर्धन आणि संख्या वाढविण्यासाठी सारस पक्ष्यांचे सॅटेलाईट टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

यासंदर्भात राज्याचे वनमंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यानंतर आता 'अवैध धंदे उघड होणार' ही चर्चा सुरू झाली आहे. सारस पक्षी राज्यातूनच नव्हे, तर देशातून लुप्त झाला आहे. मात्र गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत वैनगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये ते आढळतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सारस संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे दरवर्षी त्यांची संख्या कमी होत चालली आहे.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar On Congress : गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींची नऊ-नऊ तास चौकशी केली, तो सदुपयोग होता का?

(Gondia) गोंदिया - भंडारा जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बालाघाट सीमेवरील काही गावांमध्येदेखील सारस पक्ष्यांचा अधिवास आहे. मध्यंतरी सारस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्यामुळे याची दखल घेत न्यायालयानेदेखील चिंता व्यक्त केली होती. वन विभागाला फटकार लगावली होती. त्यानंतर आता वन विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाद्वारे सारस संवर्धनासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्विट करत गोंदिया आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यांत तसेच विदर्भातील सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सॅटेलाईट टॅगिंग करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी गोंदिया वन विभाग आणि बीएनएचएसमध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली. या माध्यमातून सारस पक्ष्यांचा अधिवास, त्यांची ठिकाणे, प्रजननाचा काळ आणि स्थलांतर आदी बाबींचा निक्षून अभ्यास करण्यात येणार आहे. सारसप्रेमींकरिता ही आनंदाची बाब आहे.

Sudhir Mungantiwar
Gondia-Bhandara News : ...तरच मी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढवणार !

ही झाली पहिली बाजू; दुसरी बाजू अशी की सारस हा पक्षी सतत स्थलांतर करणारा पक्षी आहे. त्याला पाणी असलेले क्षेत्र त्यातही नदीकिनारा, अथवा नदीपात्राजवळील भाग सहवासासाठी आवडतो. त्यामुळे साहजिक सॅटेलाईट टॅगिंग सारस भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील नदीपात्रांकडे जाणारच. सॅटेलाईट टॅगिंग सारस पक्ष्यांसाठी नदीच्या पात्रांकडे गेले, तर तेथील अवैध धंदेही उघडकीस येणार आहेत.

वैनगंगा नदीतून अवैध वाळू तस्करी, अवैध दारूच्या हातभट्ट्या, नदीपात्रातून होणारी तस्करी एका झटक्यात मंत्रालय प्रशासनासमोर उघड होणार आहेत. एका बाजूने मंत्रालय तर दुसऱ्या बाजूने सारस पक्षी संवर्धनाबाबत गंभीर असलेले उच्च न्यायालय यांच्या कायद्याच्या कचाट्यात हे अवैध धंदे सापडणार, हे निश्‍चित.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com