Bhandara BJP News : भाजपच्या निष्ठावंतांना नकोय बाहेरचा माणूस; 'प्रकाश’पर्वात झाला अंधार !

BJP : जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी वाढत असल्याचे दिसत आहे.
Prakash Balbudhe
Prakash BalbudheSarkarnama

Bhandara District BJP News : भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काल भंडारा जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जिल्हाध्यक्षांना सुपूर्त केले आहेत. त्यामुळे जिल्हा भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. (It seems that factionalism is increasing in BJP in the district)

भाजप पक्षश्रेष्ठींनी भंडारा जिल्ह्याला बाहेरचा जिल्हाध्यक्ष दिला. शिवाय या जिल्हाध्यक्षाने निष्ठावंतांना डावलून आपल्या मर्जीतील मोठी पदे दिली. परिणामी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांत जिल्हाध्यक्षांच्या विरोधात असंतोष पसरला आहे. दरम्यान, राजीनामा देणारे पदाधिकारी खासदार सुनील मेंढे गटातील असल्याने जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी वाढत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे राजीनामा देणारे पदाधिकारी उघडपणे आपला विरोध दर्शवित असल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी फळी तयार केली आहे. राजीनामा देणाऱ्यांत भाजपचे माजी जिल्हा सचिव व विद्यमान कार्यकारिणी सदस्य अजय तुमसरे, माजी पवनी तालुक्याध्यक्ष व आताचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन सुरकार, नगर पंचायत सदस्य नूतन कामडे, भंडारा शहर अध्यक्ष माला बघमारे यांचा समावेश आहे.

विधान परिषद सदस्य आमदार चद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यात भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात त्यांनी प्रकाश बाळबुधे यांना जिल्हाध्यक्ष पद दिले. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकल्याचे या राजीनामापत्रावरून दिसत आहे. बाळबुधे यांचे ‘प्रकाश'पर्व सुरू होण्यापूर्वी अंधार पसरताना दिसतोय.

बाळबुधेंच्या नियुक्तीला विरोध होता. पण काल (ता. १२) जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताच तो विरोध अधिक उघडपणे दिसून आला. त्यांनी दिलेली पदे पदाधिकाऱ्यांना पटली नाही. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी आपला जुन्या आणी नवीन पदांचे राजीनामे नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. पक्षात खच्चीकरण सुरू असल्याची ओरड कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

राजीनामा दिलेले भाजपचे (BJP) माजी जिल्हा सचिव आणि विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तुमसरे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना प्रकाश बाळबुधे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश बाळबुधे हे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचे आहेत. जिल्ह्यात पक्षात अनेक अनुभवी लोक असताना बाहेरून आलेल्या प्रकाश बाळबुधे यांना जिल्हाध्यक्षपद का देण्यात आले, असा सवाल तुमसरे यांनी केला.

Prakash Balbudhe
Bhandara News : आमदार भोंडेकरांची वाढली जबाबदारी ; जखमी गोविंदांना द्यावी लागणार शासकीय नोकरी

बाळबुदे यांनी पद स्वीकारल्यापासून निष्ठावंताचे खच्चीकरण सुरू केले आहे. लाखनी बाजारसमितीमध्ये माझे सर्वाधिक सदस्य असताना मला डावलण्यात आहे. ही बाब केवळ माझ्यापुरती मर्यादित नाही, तर भंडारा शहर अध्यक्ष पवनी तालुक्याध्यक्ष यांचाही समावेश आहे. येत्या काही दिवसांत राजीनामा सत्र अजून वेग पकडणार असल्याचेही तुमसरे सांगतात.

दुसरीकडे पवनीच्या माजी तालुकाध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ज्या धनराज जिभकाटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपशी गद्दारी केली, त्यांनाच पवनी तालुकाध्यक्ष पद देणे कितपत योग्य आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे मोहन सुरुकार यांनीही नवीन मिळालेल्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे ही मंडळी खासदार सुनील मेंढे यांच्या गटातील आहे.

देशातील सर्वात शिस्तबद्द पक्ष म्हणून भाजपकडे बघितले जाते. मात्र या शिस्तीला भंडारा जिल्ह्यात कुठेतरी तडा जाताना दिसतोय. पक्षश्रेष्ठींनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास येत्या निवडणुकीत परिणामांना भाजपला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात लक्ष घातले आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून लोक जोडताना ते दिसत आहेत. भाजपमधील अंतर्गत वाद कॉंग्रेससाठी पोषक ठरेल, यात शंका नाही.

Edited By : Atul Mehere

Prakash Balbudhe
Bhandara Congress-BJP News : जनसंवाद यात्रा आहे तरी कुणाची? काँग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com