भंडारा : भाजप ८, राष्ट्रवादी ४, काॅंग्रेस ९ जागांवर विजयी...

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचा भंडारा (Bhandara) हा गृहजिल्हा असल्याने सुरूवातीपासून राज्यासह देशभरातील लोकांचे या जिल्हा परिषदेच्या निकालांकडे लक्ष लागले होते.
Bhandara ZP
Bhandara ZPSarkarnama
Published on
Updated on

भंडारा ः भंडारा जिल्हा परिषदेच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाने (BJP) १० जागांवर, राष्ट्रवादी काॅंग्रेसने ६, (NCP) तर काॅंग्रेसने (Congress) ४ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेने (Shivsena) अद्याप खातेही उघडलेले नाही. अपक्षांच्या संघटनेने ३ जागांवर आपला कब्जा जमवला आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा गृहजिल्हा असल्याने सुरूवातीपासून राज्यासह देशभरातील लोकांचे या जिल्हा परिषदेच्या निकालांकडे लक्ष लागले होते. ५२ जागांची मतमोजणी सध्या सुरू आहे. त्यांपैकी उपरोक्तप्रमाणे निकाल लागलेले आहेत. नाना पटोले यांनी मोदींचे नाव घेऊन दिलेल्या धमक्या आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा घातल्यामुळे ही निवडणूक अधिकच चर्चेत आली होती.

आत्तापर्यंत हाती आलेले निकाल खालीलप्रमाणे -

भंडारा जिल्हा परिषद 52 जागा

भाजप – 7

1) अड्याळ - शिवा मुनघटे

2) एकोडी - मागेश्वरी नेवारे विजयी

3) भागडी - प्रियांक बोरकर

4)कुंभली- वनिता डोये

5)अंबागढ़- द्रुपडा डोंगरे

6)आमगांव- विनोद बान्ते

7)येरळी- बंडू बनकर

शिवसेना– ०

राष्ट्रवादी - 4

( 1) आष्टी - राजू देशभ्रतार,

२) कांद्री - परमेश्वर नलगोपुलवार,

3)दीघोरी मोठी अविनाथ ब्राम्हणकर

4) खामारी - रजनीश बनसोड

Bhandara ZP
भंडारा झेडपी : राष्ट्रवादीचे राजू देशभ्रतार विजयी, तर देहू नगरपंचायतीवर एकहाती सत्ता...

काँग्रेस– 9

१) कोथुरना - गायत्री वाघमारे

२) चिखला - कृष्णकांत बघेल 3)बपेरा- रमेश पारधी

4) पिंपळगाव - पुजा हजारे

5) परसोडी - शीतल राऊत

6) डोंगरगाव - देवा इलमे

7) पोहरा -विद्या कुंभरे

8)कोढ़ा -गंगाधर जीभकाटे

9)पालांदुर- सरिता कापसे

इतर –2

1)पिंडकेपार अपक्ष दीपलता समरीत

2)धारगाव- अस्मिता डोंगरे

Bsp -1

१) मासळ मतदारसंघात लता नरूले विजयी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com