Bhandara - Gondia Congress : काँग्रेसचं ठरलंय... नानाच लढवणार भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक ?

Congress State President Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्‍चित झाले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Bhandara Gondia Loksabha Political News : येत्या २०२४ चा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी गुप्त बैठकांचा सपाटा लावला आहे. दररोजच्या बैठकांमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत चर्चा होत असून ‘विनिंग’ उमेदवार देण्यासाठी पक्षाचा कस लागत आहे. (The name of Congress State President Nana Patole has been decided)

भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला शह देत येणारी लोकसभा बहुमताने काबीज करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. काँग्रेसचा हा मास्टर प्लॅन ‘सरकारनामा’च्या हाती लागला आहे. यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादीच ‘सरकारनामा’ला कळली आहे. दरम्यान, येणारी लोकसभा निवडणूक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात लढण्याची तयारी काँग्रेस पक्षाने चालवली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्‍चित झाले आहे. पुढे या यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांचेही नाव त्या उमेदवारांच्या यादीत आहे. स्वतः पक्षाचे शिलेदार काँग्रेस हायकमांड खासदार राहुल गांधी यांनी ही नावे निश्‍चित केल्याचे सूत्र सांगतात.

गेल्या काही दिवसांपासून नाना पटोलेंनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत जातीने लक्ष देण्यात सुरुवात केली आहे. नानांनी स्वतः नेतृत्व करत तीन ते १३ सप्टेंबर या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत संकल्प पदयात्रा काढली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी नानांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

ही मोर्चेबांधणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार सुनील केदार यांनीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच ते आपल्या लोकसभा मतदारसंघात जास्त वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्‍चित झाल्याने भाजपला नानांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

असा आहे इतिहास...

१९९९ पूर्वी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. केशवराव पारधी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चौथ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला गेला. २००४ आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथून विजयी झाले होते.

Nana Patole
कॉंग्रेसच्या नाना पाटोलेंचं वादग्रस्त विधान | Nana Patole On Narendra Modi | #shorts

२०१४ आणि २०१९च्या निवडणुकांमध्ये भाजपने येथून विजय मिळवला. आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे-भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष ठरलेला काँग्रेस पक्षाने आता तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांचा भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेस उमेदवार म्हणून पक्षाने विचार केल्याने काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यांतील ‘हौसे - गौसे - नौसे’ यांचे स्वप्न भंगले आहे.

राहुल गांधी यांच्या या ‘मास्टर प्लॅन’चा प्रमुख उद्देश काँग्रेसच्या जुन्या मतदाराला जोडणे हा आहे. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे त्यांचे इरादे स्पष्टपणे दाखवून दिले आहेत. त्यांच्या हा मास्टर प्लॅन कितपत यशस्वी होतो, हेही लवकरच कळणार आहे. कारण शेवटी निवडणूक भाजपसारख्या बलाढ्य पक्षाविरोधात आहे.

Edited By : Atul Mehere

Nana Patole
Chandrapur OBC Andolan: सर्वपक्षीय ओबींसीची बैठक घ्या; ताकत कळेल, असं का म्हणाले वडेट्टीवार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com