Bhandara Illegal Recovery : अवैध वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचा ‘त्या’ राजकीय नेत्याला पुळका का?

Fake receipts from Animal Market : देव्हाडा बु. ग्रामपंचायत अंतर्गत जनावर बाजारातील बनावट पावती अफरातफर प्रकरण.
Bhandara Animal Market
Bhandara Animal MarketSarkarnama
Published on
Updated on

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु. ग्रामपंचायतीच्या एका ग्रामपंचायत सदस्याने चक्क बनावट पावती पुस्तक छापून जनावर बाजारात अवैध वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात चौकशी होऊनही एका राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने त्या ग्रामपंचायत सदस्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.

तो राजकीय नेता या ग्रामपंचायत सदस्याला वाचविण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहे. त्यामुळे त्या राजकीय नेत्याला या ग्रामपंचायत सदस्याचा इतका पुळका का आला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यामुळे ‘त्या’ नेत्याची मूकसंमती या अवैध वसुलीला तर ना, ही अशी चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागलेली आहे.

Bhandara Animal Market
Bhandara Paddy News : शासनाकडून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी !

देव्हाडा बु. येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजार व बैल बाजारातील वसुली ग्रामपंचायत स्वतः करते. त्यानुसार ग्रामपंचायतीने पावती छापून सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून प्रमाणित केले आहे. मात्र एका ग्रामपंचायत सदस्याने बनावट पावती पुस्तक छापून आठवडी बाजारात पावती देऊन वसुली करण्यासाठी बाजारात बसून लोकांकडून वसुली करण्याचे काम अनेक दिवसांपासून करत होता.

याबाबत अनेक लोकांनी तक्रार केली होती. मात्र असे होऊ शकत नाही. म्हणून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र एका आठवडी बाजारात व बैल बाजारात बोगस पावती दिली जात असल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्षात चौकशी केली असता त्यांना बोगस पावती दिली जात असल्याचे कळले. त्यामुळे सरपंच व उपसरपंचांनी याबाबत खंडविकास अधिकारी मोहाडी व मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली.

खंडविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. त्यातही बोगस पावती छापून अवैधरीत्या वसुली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खंडविकास अधिकारी मोहाडी यांनी 23 ऑगस्ट 2023 ला मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांच्याकडे अहवाल पाठवला. दुसरीकडे उपायुक्त नागपूर यांच्या 13 जुलै 2023 पत्रानुसार मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी चौकशी केली असता, बैल बाजारात बोगस पावती छापून अवैध वसुली केली जात असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी खंडविकास अधिकारी मोहाडी यांना आदेश देण्यात आला. त्यानुसार खंडविकास अधिकारी मोहाडी यांनी ग्रामसेवक यांना संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पत्र दिल्यावर करडी पोलिस ठाण्यामध्ये चौकशी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाणी इथेच मुरले..

एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण दडपण्यात आल्याची माहिती आहे. आपला कार्यकर्ता असलेल्या त्या आरोपी ग्रामपंचायत सदस्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, म्हणून हा राजकीय नेता रात्रंदिवस एक करीत आहे. ‘त्या’ राजकीय नेत्याद्वारे चौकशी अधिकाऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. आता या राजकीय नेत्याच्या अशा कृत्यामुळे ग्रामपंचायत सदस्याच्या अवैध वसुलीला त्या राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याची चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे.

त्या राजकीय नेत्याच्या दबावाला झुगारून सरपंच व उपसरपंचांनी पुन्हा यासाठी पाठपुरावा करीत संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यासाठी चंग बांधल्याचे दिसत आहे. 23 जानेवारी 2024 च्या मासिक सभेत ठराव घेऊन दोषी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे ठरवण्यात आले. त्यामुळे आता ‘तो’ राजकीय नेता ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्याला वाचविण्यासाठी आणखी काय काय करतो, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com