Bhandara Shinde Group News : शिंदेंच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी, पण शिंदे जागा सोडतील का?

BJP in Bhandara : एवढ्या मोठ्या जबाबदारीचे पद सोपवण्याची खेळी भाजपने खेळली आहे.
Anup Dhoke, Chandrashekhar Bawankule and Narendra Bhondekar
Anup Dhoke, Chandrashekhar Bawankule and Narendra BhondekarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा-पवनी मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी अनुप ढोके या युवा कार्यकर्त्याची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून भाजपने शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात मतपेरणीच्या दिशेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे. (BJP has played the game of handing over the post of such great responsibility)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

भाजपकडे मुरब्बी, मातब्बर, जाणकार आणि अनुभवी नेते व कार्यकर्ते असतानाही केवळ जातीय समीकरण साधण्यासोबतच बहुजनांची मते मिळवण्यासाठी आणि शिंदे गटासोबत युती न झाल्यास सक्षम उमेदवार हवा म्हणूनच एका नव्या चेहऱ्याला लोकाभिमुख करण्याची व एवढ्या मोठ्या जबाबदारीचे पद सोपवण्याची खेळी भाजपने खेळली आहे. त्यामुळे युतीत बेबनाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात ४८ टक्के मतदार ओबीसी समाजाचे आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहता, आतापर्यंत अनुसूचित जातीतील दलित उमेदवाराला नाकारले जाते, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) या मतदारसंघात यापूर्वी केलेला प्रयोग फसला होता.

ओबीसी मतदार हिंदू दलित उमेदवाराला मतदान करतात, असा पूर्वानुभव आहे. हा इतिहास पाहता भाजपने आता सावध होत नवी व्यूहरचना आखली आहे. हिंदू दलित, उच्चशिक्षित, संघाचा कट्टर स्वयंसेवक, आजवर कोणतेही आरोप न झालेला एक युवा कार्यकर्ता म्हणून भाजपने अनुप ढोके यांना पुढे केले आहे. शिंदे गटासोबत युती न झाल्यास भोंडेकर यांच्यासमोर सक्षम उमेदवार देता यावा म्हणून भाजप ढोके यांनाच प्राधान्य देईल, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

मतदारसंघातील भाजपच्या बैठका, सभा, प्रचार सभा, लोकाभिमुख कार्यक्रम यातून ढोकेंबाबत वातावरण निर्मिती केली जात आहे. एकदा का हा चेहरा लोकांच्या नजरेत भरला की त्याला विधानसभेचे तिकीट दिले जाईल, यात तिळमात्र शंका नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा मिळावी म्हणून आमदार भोंडेकर कसोशीने प्रयत्न करीत आहेत. भोंडेकर हे हिंदू दलित आहेत. त्यांना शह देऊन या मतदारसंघात आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. शिंदे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी विद्यमान जागा सोडण्यास शिंदे तयार होणार नाहीत, हेसुद्धा तेवढेच खरे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com