Bhandara Tax Issue : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजरूक ग्रामपंचायत काही ना काही उपक्रम व विकासकामे करीत असते आणि नियमित प्रकाशझोतात असते. ही ग्रामपंचायत आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून चक्क कर थकबाकीदारांची थकीत बाकी रकमेसह यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
केवळ नोटीस बोर्डवर यादी लावून ग्रामपंचायत प्रशासन थांबले नाही, तर चौकाचौकांत कर थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. कर वसुलीचा नवा फंडा ग्रामस्थांना पाहायला मिळाला. सरांडी बुजरूक येथील ग्राम पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा विद्युत विभागाने 2 लाख रुपयांच्या वर वीजबिल थकीत असल्याने तसेच वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायतीने बिल न भरल्यामुळे खंडित केला गेला आहे.
आज घडीला चार-चार दिवस लोटूनही कर वसुली येत नाही. हे पाहून व ग्रामपंचायतीकडे सामान्य फंडात वीजबिल भरण्यास रक्कम उपलब्ध नसल्यामुळे लोकांना पिण्यास व इतर कार्यास वापराकरिता पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, कमालीचा त्रास होत आहे. हे बघून तसेच ग्रामस्थ महिला व पुरुष यांचा रोष ग्रामपंचायत सदस्यासह सरपंच व ग्रामसेवकाप्रती बोलण्यातून पाहायला मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर थकबाकीदारांना शाब्दिक मागणी, नोटीस अथवा पूर्व सूचना न देता जवळपास 300 च्या वर कर थकबाकीदारांची यादी त्यांनी भरायच्या रकमेसह तयार करून ग्रामपंचायत नोटीस बोर्ड व चौकाचौकांत लावून प्रसिद्ध केली. ही यादी पाहून थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, गावात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे यादी बघून बरेच थकबाकीदारांनी कराची रक्कम भरण्यास पंचायत गाठली आणि कर भरल्यावर त्याचे नावे यादीवरून कमी करण्यास सुरुवात झाली.
याबाबत गावात प्रचंड रोष निर्माण झाल्याने काही वेळातच सदर थकबाकीदारांच्या सर्व ठिकाणी लावलेल्या याद्या काढण्यात आल्या. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध असंतोष उफाळून आला आहे. सदर ग्रामपंचायतीने आजपर्यंत झालेली एकूण कर वसुली आणि वसुलीची रक्कम कोठे खर्च करण्यात आली, याचे उत्तर खुलासा ग्रामसेवकासह ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागण्यास सुरुवात झाली आहे. तत्काळ सदर ग्रामपंचायतीच्या प्रशासक कालावधीपासून सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.