Bhandara Vanchit News : माजी आमदार वाघाये आंबेडकरांपासूनही राहिले ‘वंचित’

Nana Patole : विदर्भातील मोठ्या ओबीसी नेत्यांच्या पंगतीत वाघाये असायचे. कालांतराने नाना पटोले यांना त्यांनी उघडपणे विरोध केला. तेव्हापासून त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला.
Sevak Waghaye, Prakash Ambedkar and Others
Sevak Waghaye, Prakash Ambedkar and OthersSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Vanchit News : काँग्रेसमध्ये 'इन' आहे की 'आउट' हे अद्याप भंडाराकरांना न कळालेले माजी आमदार सेवक वाघाये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल आदिवासी बहुजन अधिकार सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना भेटायला आलेल्या सेवक वाघाये यांची भेट त्यांच्या तोंडावरच नाकारल्याने आता 'वंचित'चे भविष्यातील दरवाजेही सेवक वाघाये यांच्यासाठी बंद झाल्याचे बोलले जात आहे.

'कोणता झेंडा घेऊ हाती' म्हणण्याची वेळ आता सेवक वाघाये यांच्यावर आली आहे. भंडारा जिल्ह्यात एकेकाळी राजकीय पटलावर सर्वांत चर्चेतील नाव म्हणजे सेवक वाघाये होते. आमदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून त्यांची ख्याती होती. विदर्भातील मोठ्या ओबीसी नेत्यांच्या पंगतीत वाघाये असायचे. कालांतराने नाना पटोले यांना त्यांनी उघडपणे विरोध केला. तेव्हापासून त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला. नाना पटोले यांनी आपली पकड काँग्रेस पक्षावर मजबूत करताच माजी आमदार सेवक वाघाये यांनी आमदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी वंचितचा हात धरला.

कालांतराने भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अचानक त्यांनी गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून काँग्रेसच्या स्टेजवर त्यांना पाहण्यात आले. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आल्याचे भंडाराकरांना समजले. मात्र, या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सेवक वाघाये काँग्रेसमध्ये नसल्याचे वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडले होते. तेव्हापासूनच सेवक वाघाये काँग्रेसमध्ये 'इन आहे की आउट' हे अद्याप कळू शकले नाही. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडशी वाघांये यांचे चांगले संबंध असल्याचे वाघाये स्वतः सांगत असले तरी काँग्रेस हायकमांडद्वारेही त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला दुजोरा मिळाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sevak Waghaye, Prakash Ambedkar and Others
Bhandara News : मुख्याधिकाऱ्यांकरिता माजी नगरसेवकांवर ‘कुणी घर देता का, घर..’ म्हणण्याची वेळ !

नाना पटोले यांचा विरोध असल्यामुळे सेवक वाघायेंचा राजकीय वनवास सुरू असल्याचे जाणकारही बोलू लागले आहेत. दरम्यान, सेवक वाघाये यांनी यंदाची काँग्रेसची भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मागून इच्छुकांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. असे असले तरी नाना पटोले यांचा व्यक्तिगत विरोध लक्षात घेता त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचेही बोलले जात आहे. याची जाण होताच त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर साकोली येथे आल्याचे पाहून वंचितची तरी तिकीट मिळते का, हे तपासण्यासाठी साकोलीच्या विश्रामगृहात आलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांना व्यक्तीशः भेटून त्यांच्याशी एकांतात बोलण्याचा मानस व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या व्यक्तीसाठी माझ्याकडे एक मिनिटाचाही वेळ नसल्याचे त्यांना सरळ तोंडावर सांगितले. दरम्यान, हा व्हिडिओ माध्यमांवर आल्याने सेवक वाघाये आता वंचितपासूनही 'वंचित' झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आपण वंचितकडून कोणताही उमेदवार उभे करा, त्याला आपण मदत करण्याचे ऑन कॅमेरा सेवक वाघाये यांनी सांगितल्याने आता नाना पटोले यांच्या हातात वाघाये यांनी आयते कोलीत दिले आहे. एक प्रकारे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीला दाखविण्यासाठी व्हिडिओ प्रूफही दिल्याची चर्चा काँग्रेस गोटात सुरू झाली आहे.

नाना पटोले यांचा विरोध असल्यामुळे सेवक वाघायेंचा राजकीय वनवास सुरू असल्याचे जाणकारही बोलू लागले आहे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात ते राजकारणापासून अलिप्त होते. तेव्हापासून अधूनमधून ते माध्यमांपुढे येत असतात. काँग्रेसच्या आंदोलनात किंवा बैठकांतही ते फारसे दिसत नाहीत. अनेक दिवस अज्ञातवासात राहिल्यानंतर आता वाघाये पुन्हा माध्यमांपुढे आले आहेत. त्यामुळे त्यांना अनेकांनी ‘भाऊ असता कुठे आजकाल?’, असा प्रश्न नक्कीच केला असेल.

Edited By : Atul Mehere

Sevak Waghaye, Prakash Ambedkar and Others
मविआच्या आतली गोष्ट ; आंबेडकरांनी सांगून टाकली | Prakash Ambedkar on MVA |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com