‘भूत’ आणि ‘पंचमहाभुतांनी’ गाजतेय नगर पंचायतीची निवडणूक...

यशोमती ठाकूर यांनी ‘आमच्या जिल्हयातील भूत’ येथे येणार असल्याचे म्हटले. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशोमती ठाकूर यांना ‘आम्ही पंचमहाभुतातले भुत’ आहोत, असे म्हटले.
Bacchu Kadu and Yashomati Thakur

Bacchu Kadu and Yashomati Thakur

Sarkarnama

Published on
Updated on

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचारात वैयक्तिक पातळीवर आरोप झडू लागले आहेत. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ‘आमच्या जिल्हयातील भूत’ येथे येणार असल्याचे 16 डिसेंबरला दुपारी घेतलेल्या सभेत म्हटले. तर सायंकाळी झालेल्या सभेत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यशोमती ठाकूर यांना ‘आम्ही पंचमहाभुतातले भुत’ आहोत, असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘भूत’ आणि ‘पंचमहाभूतां’च्या आरोपांनी जनतेचे मनोरंजन होत असले तरी येथील नागरिकांना मात्र काहीही देणेघेणे नाही. नगर पंचायतीच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर नगर पंचायतीची अवस्था ग्रामपंचायतीपेक्षा फारशी वेगळी नाही. गावाचा विकास झाला पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. नगर पंचायत झाल्यापासून दुसऱ्यांदा ही निवडणूक होत आहे. यावेळी प्रचारासाठी राज्यस्तरावरील नेते मंडळी प्रचाराचा धुराळा उडवत आहेत.

गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत स्थानिक विकास मुद्यावर बोलण्याचे सोडून मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हयातील राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव न घेता टिका केली होती. ठाकूर यांच्या आरोपांना उत्तर देण्यात बच्चू कडूही मागे राहले नाहीत. त्यांनी पंचमहाभुतातील भूत असल्याचे सांगत हे भूत जर मागे लागले तर किती उपद्रव करू शकते, याची जाणीव करून देत जोरदार टाळ्या मिळवल्या. एरवी संग्रामपूरमध्ये मंत्री येणे अवघडच. परंतु स्थानिक निवडणूक प्रतिष्ठेची बनली की दूरचे मंत्री ही वेळात वेळ काढून येतात, हेच एकाच दिवशी दोन मंत्री आल्याने दिसून आले.

<div class="paragraphs"><p>Bacchu Kadu and Yashomati Thakur</p></div>
यशोमती ठाकूर रात्रभर अमरावतीच्या तणावग्रस्त गल्ल्यांमध्ये...

विशेष म्हणजे दोन्ही मंत्री सत्तेवर असतांना त्यांना या नगर पंचायतची आठवण नसावी, हे शहरवासीयांचे दुर्भाग्य समजावे का? असा प्रश्नही या दौऱ्यांवरून निर्माण होत आहे. सत्तेत असताना येथील समस्या किंवा नागरिकांच्या अपेक्षा, यांसाठी निधीची तरतूद करण्यावर भर देण्याबाबत लक्ष दिले नाही. बरे झाले निवडणूक लागली. त्या निमित्ताने तरी या दोन मंत्र्यांना वेळ काढून संग्रामपूरच्या विकासासाठी बोलण्यास वेळ मिळाला. निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय नेता काही ना काही शक्कल लढवून आपआपले जुगाड लावण्यात पटाईत असतात, हे जनतेने ओळखले म्हणजे झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com