वर्धेत भाजपला मोठा धक्का, जिल्हाध्यक्ष डॉ. गोडेंनी धरला नानांचा ‘हात’

लवकरच डॉ. गोडे Dr. Shirish Gode यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले.
Dr. Shirish Gode Entered in Congress in the presence of Nana Patole, Sunil Kedar and others.
Dr. Shirish Gode Entered in Congress in the presence of Nana Patole, Sunil Kedar and others. Sarkarnama

वर्धा : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले भाजपला एकावर एक धक्के देत आहेत. यापूर्वी माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह काही भाजप नेत्यांना कॉंग्रेसमध्ये त्यांनी आणले. आता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांना आपल्यासोबत घेऊन भाजपला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

भाजपमधील सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून ओळख असलेले जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेसला आणखी बळ मिळणार असल्याचे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. लवकरच डॉ. गोडे यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

डॉ. शिरीष गोडे यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले होते. त्यावेळी पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत डॉ. गोडे यांची समजूत काढली होती. मात्र, पक्षात त्यांची घुसमट कायमच होती. यामुळे त्यांनी काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान आज सकाळच्या सुमारास करंजी (भोगे) येथे पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजीत कांबळे, ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती.

राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. डॉ. गोडे हे दोनवेळा भाजप जिल्हाध्यक्ष होते. गत काही दिवसांपासून डॉ. गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता. कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानंतर डॉ. गोडे यांनी वेट अँड वॉच केले. या कालावधीत डॉ. गोडे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

डॉ. गोडेंची राजकीय पार्श्वभूमी

काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ. गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र, संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पुढे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजप मजबूत करण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रशंसा भाजपचे वरिष्ठ नेतेही करायचे.

Dr. Shirish Gode Entered in Congress in the presence of Nana Patole, Sunil Kedar and others.
नाना पटोले म्हणतात; सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आमच्या आरोपांना पुष्टी !

मी २००८ पासून भाजपमध्ये काम करीत होतो. त्यावेळचा पक्ष आणि आताचा पक्ष यात मोठा फरक आहे. शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या भूमिकेमुळे राजीनामा देत आहे. गोरगरिबांचा आणि सर्वधर्म समभावच्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहे. काँग्रेसमध्ये येताच स्वगृही आल्याचे जाणवत आहे.

- डॉ. शिरीष गोडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com