भंडारा : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणाऱ्या नाना पटोलेंना (Nana Patole) गृहजिल्ह्यातच विरोध होत आलेला आहे. मग तो सेवक वाघायेंच्या रुपाने असो किंवा इतर दुसऱ्या. जिल्हा परिषद निवडणुकीतही नानांना होम पीचवरच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी निकटवर्तीय समजले जाणारे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना पराभवाचे तोंड बघावे लागले आहे.
भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेवर आपलाच झेंडा असेल, असा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रचार केला. पण, त्यांना घरच्या मैदानावरच जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पटोलेंचे निकटवर्तीय यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे हे नाना पटोलेंचे अपयश मानले जात आहे. नाना पटोले यांनी निवडणुकीच्या प्रचारात अतिशय आक्रमक मुद्दे मांडत विरोधकांना झोडपून काढलं होतं.
भंडारा जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार, असा विश्वास नानांनी बोलून दाखवला होता. पण त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे पटोलेंना जोरदार धक्का बसला आहे. रमेश डोंगरे यांच्या रुपाने भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे. भागडी गटात त्यांचा पराभव झालेला आहे. भागडी गटातून भाजपच्या प्रियांका बोरकर यांनी रमेश डोंगरे यांचा पराभव केला. भंडारा जिल्हा परिषदेत एकूण ५२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी २१ जागांचे निकाल हाती आले असून अद्याप ३१ जागांचे निकाल येणे बाकी आहे.
भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप – 9
1) अड्याळ - सुवर्णा मुनघटे
2) एकोडी - माहैश्वरी नेवारे
3) भागडी - प्रियांक बोरकर
4)कुंभली- वनिता डोये
5)अंबागढ़- द्रुपडा डोंगरे
6)आमगांव- विनोद बान्ते
7)येरळी- बंडू बनकर
8)खापा- दिलीप सार्वे
9)आंधळगाव- उमेश पाटिल
शिवसेना–
राष्ट्रवादी - 12
( 1) आष्टी - राजू देशभ्रतार,
२) कांद्री - परमेश्वर नलगोपुलवार,
3)दीघोरी मोठी अविनाथ ब्राम्हणकर
4) खामारी - रजनीश बनसोड
5)गणेशपुर- यशवंत सोनकुसरे
6)खोकरला- नंदा झंझाड
7)पाँचगाव- आनंद मलेवार
8)वरठी- एकनाथ फेंडर
9)चुल्हाद- राजू धबाले
10)बेटाला- नरेश ईश्ववर
11)सिहोरा -छगन पारधी
13)ठाना-आशा डोरले
काँग्रेस– 14
१) कोथुरना - गायत्री वाघमारे
२) चिखला - कृष्णकांत बघेल 3)बपेरा- रमेश पारधी
4) पिंपळगाव - पुजा हजारे
5) परसोडी - शीतल राऊत
6) डोंगरगाव - देवा इलमे
7) पोहरा -विद्या कुंभरे
8)कोढ़ा -गंगाधर जीभकाटे
9)पालांदुर- सरिता कापसे
10)ब्रम्ही- मोहन पंचभाई
11)वडद--मदन रामटेके
12)9)सरांण्डी (बुज)-सारिका रंगारी
13)मोहरना- विशाखा माटे
14)मुरमाड़ी सवारी -मनीषा निर्बारते
इतर –3
1)पिंडकेपार अपक्ष दीपलता समरीत
2)धारगाव- अस्मिता डोंगरे
3)देव्हाड़ि - राजेश सेलोकर
Bsp -1
१) मासळ मतदारसंघात लता नरूले विजयी
वंचित -1
1)लाखोरी -सुग्रीता पटले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.