Akola News, 11 August : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील भाजपच्या (BJP) जिल्हा विस्तारित कार्यकारिणी महामेळाव्यातील भाषण संपल्यानंतर फडणवीसांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरीही सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांच्या गाड्या मात्र कृषी विद्यापीठातच होत्या.
त्यानंतर काही काळाने पोलिसांच्या गाड्या फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने गेल्या. मेळाव्यातून बाहेर पडल्यानंतर फडणवीस हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात जातील असं पोलिसांना वाटलं. मात्र, फडणवीसांची गाडी थेट मुख्य महामार्गाच्या दिशेने गेल्यामुळे हा प्रकार घडला.
यावेळी ताफ्यातील इतर वाहने मागेच राहिली. फडणवीस विद्यापीठात न थांबता थेट पुढे गेल्याचं लक्षात येताच पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. अकोल्यात भाजपच्या (BJP) जिल्हा विस्तारित कार्यकारिणीचा आज रविवारी (ता.11 ऑगस्ट) रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला.
यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 5 हजारांहून जास्त पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. खुद्द गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेचीच चूक समोर आल्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे काही काळ पोलिसांची मोठी धावपळ झाल्याचंही पाहायला मिळाला.
अकोल्यातील महामेळाव्यातील भाषण आटोपल्यानंतर गृहमंत्री फडणवीस विमानतळाकडे निघाले होते. मात्र, पोलिसांना ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात थांबतील असे वाटले. पण फडणवीस विश्रामगृहात न थांबता थेट विमानतळाकडे गेले. ते विमानतळाकडे जातील याची कल्पना ताफ्यातील पोलिसांना नव्हती.
त्यामुळे त्यांचा ताफा पुढे निघून गेला आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर पोलिसांच्या गाड्या फडणवीसांच्या गाडीमागे गेल्याचं पाहायला मिळालं. तर फडणवीसांची गाडी मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी पोलिसांचा ताफा कृषी विद्यापीठातच होता. या वाहनामध्ये पोलिसांचे वाहन आणि रुग्णवाहिकेसह इतर वाहनांचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.