Suspension Of Ashish Deshmukh: मोठी बातमी! आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण ?

Congress Breaking News : देशमुख यांची भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी जवळीक वाढली असतानाच काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय...
Ashish Deshmukh News
Ashish Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: माजी आमदार आशिष देशमुख यांना राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यावर वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीनं देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पक्षातून तात्पुरतं निलंबित केलं होतं. यानंतर त्यांनी पक्षाच्या नोटीसला प्रत्युत्तर दिले होते.

मात्र, एकीकडे देशमुख यांची भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी जवळीक वाढली असतानाच काँग्रेस पक्षानं त्यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. देशमुख यांचं काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशिष देशमुख(Ashish Deshmukh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आऱोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, काँग्रेसपक्षाच्या शिस्तपालन समितीनं अखेर देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला होता.

Ashish Deshmukh News
Ashish Deshmukh News : फडणवीस पोहोचले आशिष देशमुखांच्या घरी, देशमुख म्हणाले...

उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर देशमुख हे पुन्हा भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यानंतर त्यांना आता ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Ashish Deshmukh News
Arvind Kejriwal in Mumbai: केजरीवालांची महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना मागणी; राज्यसभेत 'तो' अध्यादेश मंजूर करु नका

काँग्रेसच्या केदार यांच्याविरोधात देशमुख?

आशिष देशमुख सावनेरमधून लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचं देशमुख यांच्याकडे भेट देणं महत्त्वाचं मानलं जात आहे. २०१४ मध्ये देशमुख भाजपाकडून यापूर्वी काटोलमधून लढले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. पण फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार(Sunil Kedar) यांच्याविरोधात भाजपा देशमुख यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com