Buldhana : लोकप्रतिनिधींकडूनही डोळेझाक झाली; जिजाऊंच्या जन्मस्थळाची दूरवस्था केली

Sindkhed Raja : योग्य देखभाल, दुरूस्ती न झाल्यास जन्मोत्सवापूर्वी आंदोलन करणार
Birth Place of Rajmata Jijau.
Birth Place of Rajmata Jijau.Sarkarnama
Published on
Updated on

Rajmata Jijau Birth Place : संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असलेले माँ साहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजवाड्याची दुर्दशा झाली आहे. राजवाड्यात गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर राजमाता जिजाऊ यांचा या राजवाड्यात जन्मोत्सव साजरा होणार आहे. जन्मस्थळाची दूरवस्था झाल्याने राजमाता जिजाऊंचे वंशज आणि शिवभक्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संपूर्ण देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेडराजा येथे जन्मस्थळ आहे. दरवर्षी 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा करण्यात येतो. यावर्षी हा जन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दूरावस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचेही त्याकडे दुर्लक्ष आहे.

Birth Place of Rajmata Jijau.
Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या 150 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी या भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली होती. प्रशासनाला त्यांनी आडव्या हाताने घेतल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यासदंर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘सरकारनामा’नेच प्रकाशित केले होते. आता राजवाड्याची दूरवस्था झाल्याने राजमाता जिजाऊंच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारपर्यंत (ता. 10) राजवाड्याची देखभाल-दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा सर्वांनी दिला आहे. हा राजवाडा सध्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. राजवाड्याच्या अनेक भागांची पडझड होत आहे. परिसरात अस्वच्छता, कचरा, गटारे तुंबली आहेत. पावसाळ्यात उगवलेले गवत आता बरेच वाढले आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी परसली आहे. परिसरातील सीसीटीव्ही देखील बंद आहेत. भुयारात अंधार आहेत. राजवाड्याच्या भिंतीची आणि कमानींची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बुलढाणा जिल्ह्याला जिजाऊंचा जिल्हा संबोधले जाते. या जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधीला या विषयाकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. राज्यभरातून जिजाऊ आणि शिवभक्त येथे येतात. राजमाता जिजाऊ आणि शिवचरित्रावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक याठिकाणी उभे राहू शकते. परंतु या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तर आहेच याशिवाय शासनालाही लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या जिजाऊ व शिवभक्तांची निराशा होत आहे.

राजवाड्याच्या विकासार्थ शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. सुमारे आठवडाभरावर राजमाता माँ जिजाऊंचा जन्मोत्सव येऊन ठेवल्याने ही देखभाल व दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्ष सोडत राजवाड्याकडे लक्ष देण्याची गरज यामुळे निर्माण झाली आहे. 12 जानेवारीला देशभरातून लाखो जिजाऊ व शिवभक्त सिंदखेडराजा येतात. त्यांच्या समोर अशी दूरवस्थेची लक्तरे तरी निदान दाखवू नका, अशी मागणी केली जात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Birth Place of Rajmata Jijau.
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com