BJP News: भाजपला फटका बसला, तरीही सुधारत नाही; हे सरकार म्हणजे ‘पुढे पाठ मागे सपाट’!

Abhijit Wanjari: विकास आराखड्याचं प्रतिबिंब अभिभाषणात उमटायला पाहिजे होतं.
Abhijit Wanjari
Abhijit WanjariSarkarnama

Abhijit Wanjari on BJP Government : डिसेंबर २०२२मध्ये नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनावर जुनी पेंशनच्या मागणीसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी धडक दिली. पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. नंतर झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला त्याचा जबरदस्त फटका बसला. पण भाजप अजूनही सुधारायला तयार नाही, असे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी म्हणाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर वंजारी आज विधान परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, जुनी पेंशन सरकारला द्यावी लागेल. ती कशी देता येईल, याचा विचार करावा लागेल. याशिवाय बेरोजगारांचा विचार झाला पाहिजे. त्यांना भत्ता देता येईल का, याचा विचार झाला पाहिजे. सरकार मेट्रो, मोठमोठे हायवे करीत आहे. चांगली गोष्ट आहे. पण दुसरीकडे बेरोजगारीचाही विचार झाला पाहिजे.

रिक्त जागा भरल्या पाहिजे. राज्याची लोकसंख्या साडेबारा ते तेरा कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे हा विषय गंभीर होऊ शकतो. विकास आराखड्याचं प्रतिबिंब अभिभाषणात उमटायला पाहिजे होतं. धोरण आणि योजनांचा उल्लेख असायला पाहिजे होता. पण तसं काही राज्यपालांच्या भाषणात आढळलं नाही. मराठी भाषा दिवस कुसुमाग्रजांच्या नावाने आपण साजरा करतो. यामध्ये मागील सरकारचा निर्णय बदलवला.

ठिकठिकाणी मराठी भाषा भवन व्हायला पाहिजे. पण त्याबाबत राज्यपाल काही बोलले नाही. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट जर सोडला तर इतर कार्यक्रम घेतले नाही. मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला नाही, असा आरोप आमदार वंजारी यांनी केला.

Abhijit Wanjari
आमदार वंजारी म्हणाले, ‘ती’ चर्चा आम्हाला नेहमीच ऐकायला मिळते !

अनेक योजना गेल्या ४० वर्षापासून रखडल्या आहे. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प गेल्या ३५ वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. पण नवनवीन योजना मात्र घोषित केल्या जातात. पुढे पाठ मागे सपाट, अशी सरकारची स्थिती झाली आहे. इंदिरा आवास आणि रमाई घरकुलासंदर्भात गरिबांना घरकुल दिल्यानंतर अनुदानाचा दुसरा हप्ता दिलेला नाही. ७५ हजार नोकऱ्या देण्याचा कांगावा केला. पण गेल्या वर्षभरात त्या दिल्या नाही. रिक्त जागा भरण्यासाठी विशेष प्रयत्न दिसायला पाहिजे होते. पण राज्यपालांच्या (Governor) अभिभाषणात ते दिसले नाही.

एमपीएससीचा (MPSC) कारभार ढिसाळ सुरू आहे. कार्यपद्धती व्यवस्थित नाही. विद्यार्थी एमपीएससीच्या चुकांमुळे हतबल झाले आहे. काही नियुक्त्या झाल्या, पण ते लोक रुजू झाले नाही. परीक्षांमध्ये चुका राहिल्या आहे. पेपर फुटले, हे विषय सरकार (Maharashtra Government) गंभीरतेने घेणार आहे की नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाहिजे. तज्ज्ञांना पाचारण केले पाहिजे आणि कारभार व्यवस्थित केला पाहिजे. लाखो विद्यार्थी अभ्यास करतात, पण त्यांच्यावर अन्याय होतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com