भंडारा भाजपमध्ये गटबाजीने आग : बावनकुळेंचा बंब रवाना...

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपमध्येच (Bjp) दोन गट पडल्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
Chandrasekhar Banavakule News
Chandrasekhar Banavakule Newssarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेत भाजपमधील गटबाजी शमविण्यासाठी भाजप (Bjp) प्रदेश सरचिटणीस व नागपूर विधानपरिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Banavakule) यांची नियुक्ती 'निरीक्षक' पदी करण्यात आली आहे. आपल्या राजकीय मुसद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेले बावनकुळे जिल्हा परिषदेची भाजपची गटबाजी कशी शमवितात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. (Chandrasekhar Banavakule News)

Chandrasekhar Banavakule News
खासदार राणांना VVIP उपचार : शिवसेनेचे लीलावती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

जिल्ह्यात नुकताच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परंपरागत मित्र काँग्रेस सोबत न जाता भाजपशी हातमिळवणी केली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी (10 मेला) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात राजकीय गणित बिघडू शकतात. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) व काँग्रेस (Congress) हे एकमेकांचे वैरी झाले आहेत.

Chandrasekhar Banavakule News
Beed : नवनीत राणांचे आव्हान शिवसेनेच्या मंत्र्याने स्वीकारले ; मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर अमरावतीतून लढणार..

त्यामुळे भाजपला सुवर्णसंधी आहे. मात्र, एनवेळी भाजपमध्येच दोन गट पडल्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या गटात चढाओढ निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता पक्ष श्रेष्टींनी बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्रे दिली आहेत. त्यामुळे भाजपच्या दोन गटातील वाद बघता बावनकुले हे गटबाजीचे इंद्रधनुष्य कसे पेलतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com