Nitin Gadkari : नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज मेट्रोसाठी प्रयत्नांवर भर

Metro Service : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशात व्यक्त केला मनोदय
Chindwara to Nagpur Metro
Chindwara to Nagpur MetroGoogle
Published on
Updated on

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेशातील महत्वाचं शहर असलेले छिंदवाडा आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांच्यातील अंतर अधिक कमी व्हावं असं अनेक दिवसांपासून वाटतय. त्यामुळं छिंदवाडा आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारी ब्रॉडगेज मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गडकरी यांनी मध्य प्रदेशचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी छिंडवाडा आणि नागपूरला जोडणारी मेट्रोसेवा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. (BJP Leader & Central Minister Nitin Gadkari Said He Will Take Efforts to Start Broad Gauge Metro Between Chhindwara to Nagpur)

व्यवसायाच्या निमित्तानं छिंदवाडा आणि नागपुरातील व्यापाऱ्यांचं या शहरांमध्ये येणं-जाणं सुरू असतं. याशिवाय मोठ्या प्रमाणावर नागरीक या दोन्ही ठिकाणावरून प्रवास करतात. सध्या छिंदवाडा आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान अनेक बसेस धावतात. रेल्वेच्या माध्यमातूनही पोहोचता येतं. परंतु प्रवासाचे तास कमी करण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचा मानस आहे, असं गडकरी म्हणाले.

छिंडवाडा-नागपूर प्रवास करण्यासाठी कमीत कमी वेळ लागायला हवां असं आपलं मत आहे. त्यासाठी १४० किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी मेट्रो सुरू करण्याचा विचार आहे. अर्थात यासाठी मध्य प्रदेश व महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार लागणार आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार आहे. परंतु मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आल्यास त्यासाठी दिल्लीस्तरावर आपण प्रयत्न करू असं गडकरी यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशातील परसिया, सौसरचा दौरा केल्यानंतर गडकरी यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशात झपाट्यानं विकास झालाय. एकेकाळी छिंदवाड्यातील रस्त्यांची अवस्था प्रचंड वाईट होती. छिंदवाडाहून नागपूरला जाण्यासाठी पाच तास लागायचे. सगळं चालतं पण छिंछवाड्यातील रस्त्यांवरून प्रवास नको असं लोक त्यावेळी म्हणाले. आता परिस्थिती बदलली आहे. छिंडवाडाच काय तर मध्य प्रदेशातील दळणवळणाची साधनं सक्षम झाली आहेत. येथील भाजप सरकारनं नवीन रस्ते तयार केले आहेत. त्यामुळं प्रवासाचा वेळ तीन तासांवर आलाय. हा वेळ आणखी कमी करण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

ब्रॉडगेज मेट्रोमुळं नागपूरपासून मध्य प्रदेशाकडं रोजगाराची निर्मिती होऊ शकेल. या भागातील व्यवसायांनाही त्यामुळं चालना मिळेल. छिंदवाडा येथे आणखी दोन कोळसा खाणी कार्यान्वित होत आहेत. नवीन कोळसा खाणींमुळंही येथे लोकांना रोजगार मिळेल. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

Chindwara to Nagpur Metro
Nitin Gadkari : पाच राज्यांतच नव्हे संपूर्ण देशात पुन्हा कमळ फुलणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com