Video Chandrakant Patil: बच्चू कडू यांची नाराजी चंद्रकांतदादा दूर करणार का?

Amravati Chandrakant Patil Visit Bacchu Kadu Residence: काही दिवसापूर्वी पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली होती. आज चंद्रकांत पाटलांनी कडू यांची भेट घेतल्याने बच्चू कडू यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत.
Chandrakant Patil Visit  Bachu Kadu Residence
Chandrakant Patil Visit Bachu Kadu ResidenceSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख,आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर आता त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील हे बच्चू कडू यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी गेले आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जाते.

विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार शक्यता नाकारता येत नाही. या तिसऱ्या आघाडीचा फटका महायुती आणि आघाडीलाही बसू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नेतेमंडळी बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली होती. आज चंद्रकांत पाटलांनी कडू यांची भेट घेतल्याने बच्चू कडू यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Chandrakant Patil Visit  Bachu Kadu Residence
Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत आघाडीकडून उद्धव ठाकरेंवर मोठी जबाबदारी

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची इच्छा व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांची त्यांना साथ मिळणार असल्याचे समजते. राजू शेट्टी आणि इम्तियाज जलील यांनी राज्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले.

Chandrakant Patil Visit  Bachu Kadu Residence
Prakash Awade: आमदार आवाडेंचा महायुतीला दे धक्का; माघार घेत तीन उमेदवार देण्याची केली घोषणा

ही तिसरी आघाडी विधानसभेत राज्यातील भाजप प्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित आहे. हे तीनही आक्रमक, लढाऊ नेत्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली तर ही महायुती अन् महाविकास आघाडीच्या नेत्याचे टेन्शन वाढवणार हे नक्की..

पुण्यात शरद पवार यांच्या भेटीनंतर विधानसभेला 'मविआ'सोबत जाणार का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी म्हटलं, "अजून तसे काही ठरलं नाही. 1 सप्टेंबरपर्यंत महायुती सरकारला 'अल्टिमेटम' दिला आहे. महायुतीत मी खूश असो किंवा नसो. शेतकरी, मजूरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या नाराजीचा सूर नेहमी आम्ही सरकारसमोर ठेवत असतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com