Vikhe Patil on NCP : जनाधार गमावलेल्यांना काय महत्त्व देता, त्यांच्याकडं उरला नाही एकही नेता

Criticism of Supriya Sule : सुनील तटकरेंच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe Patil at Akola
Radhakrishna Vikhe Patil at AkolaSarkarnama
Published on
Updated on

Visit to Akola City : शरद पवार यांच्याकडील राष्ट्रवादी काँग्रेस जनाधार गमावलेला पक्ष आहे. अशा लोकांच्या मागणीला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असा टोला भाजप नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला येथे व्यक्त केली. पक्षविरोधी कृती केल्यानं सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर विखे पाटील यांनी हे उत्तर दिलं. विखे पाटील रविवारी (ता. ५) अकोल्याच्या दौऱ्यावर होते.

खासदार अपात्रतेबाबत सुप्रिया सुळे यांचं पत्र चर्चेत आलंय. सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठलंय. त्यात अजित पवार यांच्या गटासोबत गेलेल्या खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै रोजी याचिका दाखल केली. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याची विनंती सुळे यांनी केली आहे. (BJP Minister RadhaKrishna Vikhe Patil on NCP says Sharad Pawar group is a party that has lost mass)

परिशिष्ट १० नुसार पक्षविरोधी कृती केल्यानं सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. यावर विखे पाटील यांनी अशा बाबींना फार महत्त्व देणं गरजेचं नसल्याचं म्हटलंय. शरद पवार आणि त्यांच्या गटानं जनाधार गमावलाय. त्यामुळं ज्यांना आधारच नाही अशांच्या बोलण्याकडं काय लक्ष द्यायचं, असं विखे पाटील म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री द्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे घेतील. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा हा या तीन नेत्यांच्या अखत्यारितील आहे. त्यामुळं त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं विखे यांनी नमूद केलं. कांद्याच्या निर्यात धोरणावर ते म्हणाले, निर्यात शुल्क वाढवण्याचा जो निर्णय झालाय, तो मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतो. अनेकवेळा निर्णय करावे लागतात निर्यात वाढली, की किमती वाढतात उत्पादन कमी जर असेल तर सामान्य नागरिकांची काळजी सरकारला करावी लागते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आंदोलनदरम्यान झालेल्या हिंसाचारात असामाजिक तत्त्वांना हात साफ केले. आरक्षणासाठी मराठा समाज अशी हिंसक कृती करणं शक्यच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरू केलं. अशा आंदोलनाला पाठिंबा आहेच. आरक्षण मिळावं यासाठी विरोध नाही. सध्या सरकार या मुद्द्यावर तोडगा काढतेय. लवकरच मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल, अशी अपेक्षाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

शर्मा परिवाराचं सांत्वन

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या परिवाराचीही विखे पाटील यांनी भेट घेतली. आमदार शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांनी शर्मा परिवाराचं सांत्वन केलं. आमदार शर्मा यांच्या पत्नी गंगादेवी शर्मा, मुलं कृष्णा, अनुप यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, ॲड. किरण सरनाईक, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक शरद जावळे, पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर आदी या वेळी उपस्थित होते.

(Edited By : Prasannaa Jakate)

Radhakrishna Vikhe Patil at Akola
Radhakrishna Vikhe : ...तेव्हा मग 'स्कॅम मास्टर' सचिन वाझे 'मातोश्री' अन् 'वर्षा'वर काय करत होता? विखेंचा राऊतांना सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com