भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू; इतर सहा विद्यार्थ्यांचाही दुर्दैवी अंत

देवळीहून वर्धेला जाताना सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली आणि यात सातही जणांवर काळाने घाला घातला
BJP MLA's son dies in car accident
BJP MLA's son dies in car accident
Published on
Updated on

वर्धा : वर्ध्यात (Wardha) झालेल्या भीषण कार अपघातात (car accident) भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आमदाराच्या मुलावरही काळाने घाला घातला आहे. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangdale) यांच्या मुलचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला. धक्कादायक म्हणजे या अपघातात त्यांच्या मुलासह सात विद्यार्थीही दगावले आहेत. यामुळे रहांगडाले कुटुंबीयांसह संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे. (BJP MLA's son dies in car accident)

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस, नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस, विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1, प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1 अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्य़ांची नावे आहेत. मृतांमध्ये भंडाऱ्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याच्यासह त्याच्या मित्रांचाही मृत्यू झाला आहे, यात इतर 6 जण विविध भागातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले होते.

BJP MLA's son dies in car accident
पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण देवळी येथून वर्धेला निघाले असताना सेलसुरा जवळ या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पुलावरून कार थेट ४० फूट खाली कोसळली. इतक्या उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांची वये 25 ते 35 च्या दरम्यान आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.

चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कार थेट पुलावरुन खाली कोसळल्यानं या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तब्बल चार तासाहून अधिक काळ मृतदेह कारमधून बाहेर काढण्याचं काम सुरु होतं.

विजय रहांगडाले यांच्या मुलासह इतर सहा विद्यार्थ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या ठिकाणी गेल्या ४८ तासात झालेल्या तीन अपघातात १५ जणांनी आपला जीव गमावला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. र तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. एकूण सात जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com