
Ramdas Athawale reaction on Kangana : प्रसिद्ध अभिनेत्री भाजप खासदार कंगना राणावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देवाचा अवतार असल्याचे म्हटले. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत, कंगना यांचा मुद्दा खोडून काढला आहे.
मोदी देवाचा अवतार आहेत, असं मला वाटत नाही, ते मानवाचाच अवतार आहेत, आणि ते अतिशय स्ट्राँग आहेत, असे आठवले यांनी म्हटले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे बुलढाणा इथं दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपमध्ये राजकीय सेवानिवृत्तीचं वय 75 वर्षे आहे. पंतप्रधान मोदी यांना सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्या सेवानिवृत्तीवर डिवचत आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांनी मोदींना पुन्हा एकदा देवाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. त्यावर मंत्री आठवले यांनी खुमासदारपद्धतीने प्रतिक्रिया दिली.
रामदास आठवले म्हणाले, "नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच वय झालं असलं, तरी ते स्ट्राँग आहेत, आणि त्यामुळे ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. विरोधकांना वादंग उठवल्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही. विरोधकांची ताकद क्षीण झालेली आहे, त्यांच्यामध्ये आता एकजूट राहिलेली नाही".
खासदार कंगना राणावत यांनी मोदी यांना देवाचा अवतार म्हटले होते. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मला असं काही वाटत नाही. मोदी देवाचा अवरात नाहीत. ते मानवाचाच अवतार आहेत. जगभरातील पंतप्रधान यांच्या झालेल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना 80 टक्के लोकांनी पसंती दिली, ते अतिशय स्ट्राँग पंतप्रधान आहेत, जगातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांचं नाव आहे. मात्र ते देवाचा अवतार आहेत, या मताशी मी सहमत नाही, असे सांगितले.
आगामी निवडणुकीपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष राहणार नाही, असे टोला मंत्री आठवले यांनी लगावला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते राहतील.पण मात्र त्यांचा पक्ष स्ट्राँग म्हणून राहणार नाही. त्यांचे 20 आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत चार आमदार येतील की नाही, हे सांगता येत नाही, असे ही मंत्री आठवले यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.