BJP Nagpur News : मंत्रिमंडळाच्या विस्तारात नागपूरमधून कोण? भाजपमध्ये ‘या’ दोन नावांची चर्चा !

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री होते.
Sameer Meghe and Krishna Khopade
Sameer Meghe and Krishna KhopadeSarkarnama
Published on
Updated on

MLA Khopde's name was heavily discussed : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर रविवारी (ता. २) त्यांच्यासोबत आलेल्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Eknath Shinde and Devendra Fadnavis announced that the Cabinet will be expanded)

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे जाहीर केले असल्याने पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यातून कोणाचा नंबर लागेल याची चर्चा सुरू झाली आहे. सातत्याने निवडून येणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्यापैकी एकाचा मंत्रिमंडळात नंबर लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-सेना युतीचे सरकार असताना खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.

सरकार स्थापनेपूर्वी भाजपमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी सोडण्याची जाहीर तयारी खोपडे यांनी दाखवल्यामुळे त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री होते. दोन महत्वाचे खाते नागपूरकडे असल्याने खोपडे यांच्या नावाचा विचार केला नाही असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

आता जिल्ह्यात फडणवीस (Devendra Fadanvis) वगळता कोणीही मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे खोपडे यांचा यावेळी नक्कीच विचार केला जाईल, असा दावा केला जात आहे. खोपडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचे पूर्व नागपूरमधील (Nagpur) दुकान बंद केले. तेव्हापासून कुठल्याच काँग्रेसच्या उमेदवाराला हा मतदारसंघ परत मिळवता आला नाही.

Sameer Meghe and Krishna Khopade
DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री होताच BJPची तारीफ | PM Narendra Modi | NCP - BJP - Shivsena Alliance

समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे ‘रिपोर्ट कार्ड' उत्तम असल्याचे भाजपच्या (BJP) सर्वेतून समोर आले आहे. ग्रामीण भागात भाजपची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची सर्वच नेत्यांसोबत जवळीक आहे. त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांचे पुत्र समीर मेघे यांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन त्यांचा सन्मान केला जाऊ शकतो.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com