

Navneet Rana : भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नगरपालिकांची निवडणूक राष्ट्रीय मुद्यांनी गाजवत आहे. नवनीत राणा यांच्या भाषणात, वारंवार धर्मिक मुद्दे येत आहेत.
'कटेंगे ते बटेंगे' हा नारा देताच, बाबरी मशीदचा देखील मुद्दा नवनीत राणा यांनी प्रचारात आणला आहे. त्यामुळे ही स्थानिक नगरपालिकांची निवडणूक आहे की, राष्ट्रीय पातळीवरची आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजप (BJP) माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचारात उतरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत गाजलेली भाजपची घोषणा 'कटेंग ते बटेंगे' ही पुन्हा स्थानिक नगरपालिका निवडणुकीत त्यांनी दिली आहे.
अमरावतीमधील अचलपूर इथंल्या नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी थेट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पश्चिम बंगालमधील मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ही निवडणूक स्थानिकची आहे की, खासदारकीची आहे, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
अमरावतीमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी येऊन गेले. त्याचा संदर्भ घेत, नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांचे नाव कशाला घ्यायचे, आपण रामाचे नाव घेणारे लोक आहोत. पश्चिम बंगालमध्ये आता, आवाज उठू लागला आहे की, सहा डिसेंबरला बाबरी पाडली गेली होती, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा एक आमदार म्हणतो की, सहा डिसेंबरला बाबरी पाडली गेली होती, याच 6 डिसेंबरला पुन्हा बाबरीचा पाया घालू."
"या देशांमध्ये बाबर बरोबरच त्याची औलाद देखील पैदा होणार नाही. नाही कुठेही बाबरी मशीद बांधली जाणार. ममता बॅनर्जी यांना सुद्धा माझं सांगणं आहे की, त्यांनी राम जप सुरू करावा. महाराष्ट्रमध्ये येऊन महाराष्ट्र सरकार काय करत आहे ते! एकदा बघून घ्या. या देशांमध्ये रामजी थे, रामजी है और रामजी रहेंगे," असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
'तुम्ही म्हणता की काँग्रेसने मुसलमानांना तिकीट दिले, तर आम्ही कधी म्हणतो की, तुम्ही आमच्या लोकांना तिकीट दिली. काँग्रेसच्या रक्तामध्ये जे आहे, ते त्यांनाच तिकीट देणार. आम्ही राम भक्त आहोत आणि भाजप राम भक्तांनाच तिकीट देणार, असे सांगून, AIMIM अन् काँग्रेस यांची उमेदवार एकमेकांची मतं खाण्यासाठी उमेदवार देण्याचा आरोपात गुंतल्याचे सांगितले जाते. पण हे फक्त फतवा निघायची वाट पाहत आहे. फतवा निघाला की ते एक होतील. एकालाच मतदान करतील,' असा घणाघात देखील नवनीत राणा यांनी केला.
'ही लढाई इथं संपलेली नाही. यानंतर दुर्गादेवी आणि गणपतीवर यांनी कोणीही दगड फेकला नाही पाहिजे. जिंकायचा असेल, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फक्त इमानदारी ठेवली पाहिजे. बाकी काहीच नको,' असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.