Wardha Loksabha Constituency : सुमित वानखेडेंचं ठरलं... वर्ध्यात नेमकं काय करायचं ?

BJP at Doorstep : पक्षाचं काम पोहोचविण्याची धडपड की राजकारण
Wardha Loksabha Constituency : सुमित वानखेडेंचं ठरलं... वर्ध्यात नेमकं काय करायचं ?
Published on
Updated on

Wardha District Politics : सध्या वर्धा जिल्ह्यात भाजपनं आपल्या कार्याच्या जोरावर चांगलीच पकड जमवली आहे. जिल्ह्यातील घराघरांपर्यंत भाजपचं संपर्क अभियान सुरू झालं असून, त्यातून प्रामुख्यानं तरुणाईला पक्षाशी जोडण्याचा मोठा प्रयत्न भाजप करीत आहे. विशेषत: आर्वी विधानसभा मतदारसंघावर पक्षानं अधिक लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे सुमित वानखेडे वर्धा लोकसभा मतदारसंघासह आर्वीत भाजपला जनतेच्या मनामनांत नेण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

आर्वी मतदारसंघात आष्टी, कारंजा आणि आर्वी या तालुक्यांचा समावेश आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आर्वी मतदारसंघात भाजपचं बऱ्यापैकी वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळं भाजपचा हा गड कायम ठेवण्यासाठी पक्षानं पूर्वीपासूनच मोर्चेबांधणी कायम केली आहे. (BJP Reaching Doorstep of Aarvi Assembly Constituency of Wardha District whith Help of Sumit Wankhede)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांच्याकडं पक्षानं वर्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रभारी पद सोपवलं आहे. जूनमध्ये लोकसभा प्रभारी झाल्यापासून वानखेडे हे झोकून देत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी आणि अमरावती जिल्ह्यांतील मोर्शी, धामणगाव रेल्वेचा समावेश आहे. यातील चार विधानसभा मतदारसंघ भाजप, तर प्रत्येकी एक काँग्रेस आणि अपक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपला अधिकची बळकटी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी विशेष लक्ष दिले आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपला त्यामुळं ताकद मिळाली. आर्वी तालुक्यात तर भाजपनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. आष्टीतही भाजपनं यश मिळवलं. संपर्क से समर्थन अभियान, मागेल त्याला शेततळे, महाऑरेंज प्रकल्प, पर्यावरण बचाव समिती बैठक, ओबीसी जागर यात्रा, मेरी माटी मेरा देश अभियान, कृषी प्रदर्शन, सेवा पंधरवाडा, ग्रामभेटींच्या माध्यमातून सुमित वानखेडे सध्या सामान्यांपर्यंत भाजपला घेऊन जात आहेत. ३०० खाटांचं रुग्णालय, आर्वीतील शासकीय विश्रामगृह, पुलांची कामं, शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ, सोयाबीनवरील मोझॅकचा प्रादुर्भाव, अशा अनेक प्रसंगी ‘फ्रंटफूट’वर येत ते काम करीत आहेत. त्यामुळं आर्वीच नव्हे, तर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचं नेटवर्क वेगानं वाढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्वीसह संपूर्ण लोकसभा मतदारसंघात वानखेडे सक्रिय झाल्यानं भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली आहे. आर्वी मतदारसंघातून सुमित वानखेडे हे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. वानखेडे याबद्दल सांगतात की, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पूर्ण करण्याकडं अधिक लक्ष देत आहे. काही जबाबदाऱ्या पक्षानं अत्यंत विश्वासानं सोपविल्या असून, त्या पूर्ण करणे गरजेचं आहे. बाकी सर्व मुद्दे त्यापुढे गौण आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Wardha Loksabha Constituency : सुमित वानखेडेंचं ठरलं... वर्ध्यात नेमकं काय करायचं ?
Wardha Loksabha : पहेलवान खासदार रामदास तडस हॅट्रिक मारतील, की...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com