Maratha Reservation : बावनकुळेंनी योग्य ठरवली छगन भुजबळ यांची भूमिका

Chandrashekhar Bawankule : नागपुरात मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत बोलणं टाळलं
Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation
Chandrashekhar Bawankule on Maratha ReservationGoogle
Published on
Updated on

Manoj Jaranhe Patil Vs Chagan Bhujbal : राज्यातील वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेतलीय, ती सर्वपक्षीय बैठकीत ठरलेल्या भूमिकेप्रमाणं आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी काम करावं असं ठरलं होतं. तीच भुजबळांची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. मंगळवारी (ता. ७) त्यांनी उपराजधानीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणं सरकारनं काम करावं असेच सध्या भुजबळ बोलत आहेत. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं सांगितलं होते की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल. मराठा समाजाला जसं आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलं होतं, तसंच आरक्षण दिलं पाहिजे. याचा मुद्द्यावर छगन भुजबळांचही म्हणणं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. (BJP State President MLA Chandrashekhar Bawankule justified the role of Chagan Bhujbal on Maratha Reservation in Maharashtra)

छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मंत्री आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल आपण बोलणं योग्य नाही. परंतु भुजबळ यांची भूमिका ही सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी असू शकत नाही, असं बावनकुळे यांनी नमूद केलं. मराठा आरक्षणावरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील सातत्याने आमने-सामने येत आहेत. त्यावर बरच राजकारणही होतेय. त्यासंदर्भात विचारल्यानंतर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारनं जसं आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. तसच आरक्षण विद्यमान सरकार मराठ्यांना देईल यात दुमत नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील हिंसेबद्दल जे आरोप केले आहेत, तो चौकशीचा भाग आहे. पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत. तपासानंतर वस्तुस्थिती काय आहे, हे जगापुढं येईलच असं बावनकुळे यांनी नमूद केलं. महाराष्ट्र जळतोय. मराठा आणि ओबीसी समाज समोरासमोर येतोय यासाठी उद्धव ठाकरे व त्यांचं त्यावेळचं सरकार जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचा खऱ्या अर्थानं जर कुणी घात केला असेल, तर तो उद्धव ठाकरे यांनी केलाय, असा आरोप आमदार बावनकुळे यांनी पुन्हा एकदा केला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कायम राहिले असते. त्यांच्याच नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला असता. त्यातून मराठा आरक्षण टिकवता आलं असतं. त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा कुणी घात केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केलाय, असा घणाघातही आमदार बावनकुळे यांनी केला.

Edited by : Atul Mehere

Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation
#Short : ग्रामपंचायतीच्या निकालावरून नाना पटोलेंची भाजपवर आगपाखड | Nagpur Grampanchayt Election

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com