Gram Panchayat Election : वर्ध्यात भाजपचं कमळ उमललं; २७ पैकी २० ठिकाणी विजय

Wardha News : आर्वी, आष्टीसह अनेक तालुक्यात आनंदोत्सव
Gram Panchayat Election In Wardha
Gram Panchayat Election In WardhaGoogle
Published on
Updated on

Excitement among BJP workers : वर्धा जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं बाजी मारलीय. भाजपनं २७ पैकी २० ग्राम पंचायतींमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलय. आर्वी तालुक्यात सात पैकी सात ग्राम पंचायतींवर भाजपची सत्ता आलीय. हिंगणघाटमध्ये तीन पैकी तीन, आष्टी तालुक्यात आठ पैकी सहा, समुद्रपूर तालुक्यात सात पैकी चार ग्राम पंचायतींमध्ये भाजपनं सत्ता काबीज केलीय. देवळी तालुक्यात मात्र भाजपला पाहिजे तसं यश आलेलं नाही. येथे दोन्ही ग्राम पंचायतीवर काँग्रेसनं सत्ता मिळवलीय

हिंगणघाट येथील शेगावकुंड येथे ३० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या शेतकरी संघटनेला धूळ चारण्यात भाजपला यश आलय. येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांना पराभव पत्करावा लागला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आमदार समीर कुणावार यांनी तर आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार दादाराव केचे यांनी ग्राम पंचायत खेचून आणल्या. (BJP's lotus blossomed in Wardha district Gram Panchayat Election Win at 20 places)

आर्वी विधानसभा मतदार संघात भाजपनं काँग्रेसला चांगलाच झटका दिलाय. आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकीत पहिले दोन सरपंच अविरोध आणण्यात भाजपाला यश आलं. उर्वरित पाच ठिकाणी भाजपनं आपला सरपंच बसवलाय. भादोड, बोथली नटाळा, इटलापूर, जळगाव, नदोरा येथे भाजपाचे सरपंच विजयी झालेत. मालेगाव ठेका व कोपरा पुनर्वसन येथे भाजपनं अविरोध सरपंच बसवलाय. सात पैकी चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता होती मात्र भाजपनं त्या काँग्रेसकडून आपल्याकडे खेचल्या. निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला.

देवळी विधानसभा मतदार संघात भाजपच्या हातात भोपळा आलाय. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आमदार रणजित कांबळे यांनी हा गड पुन्हा राखलाय. या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर एका ग्रामपंचायतीची सरपंच पदाची पोटनिवडणूक होती. यातील धामणगाव वाठोडा व बोपापूर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसनं सर्व सदस्यांना विजयी करीत एकहाती सत्ता काबीज केलीय. दिघी येथील सरपंचच्या सार्वत्रिक निवडणुकीत युवा संघर्ष मोर्चानं बाजी मारलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मांडवा येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारानं १७ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलाय. जऊळगाव येथे एका सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होती. यात काँग्रेसचा विजय झालाय. निवडणुकीनंतर आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी सर्व नवनिर्वाचिंतांसह आनंदोत्सव साजरा केला.

समुद्रपुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निकालात संमिश्र कौल बघायला मिळाला. तालुक्यात भाजपाला दोन, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन, राष्ट्रवादी पवार गटाला दोन, प्रहारला एका ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश आलंय. या तालुक्यात भाजपची जाम आणि बरफा या गावात सत्ता होती. यंदा जाम येटगे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं तर बरफा येथे पवार गटाने आपली सत्ता स्थापन केलीय.

वर्धा तालुक्याच्या नटाळा पुनर्वसन येथे भाजपने सत्ता राखलीय. हिंगणघाट तालुक्याच्या तीनही ग्रामपंचायतीवर भाजपाचा कब्जा झालाय. हिंगणघाट तालुक्याच्या शेगाव कुंड, उमरी आणि धामणगाव या ग्रामपंचायतींवर भाजपनं यश मिळवलय. तीनही ग्रामपंचायतील भाजपाचे सरपंच निवडून आलेत. शेगाव कुंड आणि उमरी या ग्रामपंचायत पहिले शेतकरी संघटनेच्या ताब्यात होत्या. आता भाजपनं यात विजय संपादन केलाय.

(Edited By : Prasannaa Jakate)

Gram Panchayat Election In Wardha
Wardha Lok Sabha Seat : काँग्रेसकडे असलेल्या वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही; उमेदवारीसाठीही सरसावले नेते!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com