Lok Sabha Election 2024 : भाजपचे 'ओबीसी कार्ड', संजय धोटेंपर्यंत येऊन पोहोचला शोध !

Balu Dhanorkar : मोदी लाटेत काँग्रेसचे उमेदवार दिवगंत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले होते.
Sanjay Dhote, Sudhir Mungantiwar and Hansaraj Ahir
Sanjay Dhote, Sudhir Mungantiwar and Hansaraj AhirSarkarnama

Lok Sabha Election 2024 : मोदी लाटेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढविली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील सामाजिक समीकरणात बसणारा आणि सर्वसमावेशक उमेदवारांच्या नावावर पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. यात राजुऱ्याचे माजी आमदार संजय धोटे यांचेही नाव चर्चेत आहे.

लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात पक्षाकडून विचारणा झाली आहे, याला धोटे यांनीही पुष्टी दिली. त्यामुळे भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता चांगली स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे उमेदवार दिवगंत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले होते. ते राज्यातील कॅांग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या विजयात अनेक घटकांचा समावेश आहे.

Sanjay Dhote, Sudhir Mungantiwar and Hansaraj Ahir
#Short : Cricketnama 2023, Cricketnama 2023 Nagpur , Sudhir Mungantiwar, BJP

ओबीसी समाजाचे एकत्रिकरण त्यांच्या पथ्यावर पडले. त्यांच्या निधनानंतर राजकीय समीकरण बरीच बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. हंसराज अहीर यांनी यांसदर्भात अनेकदा नाराजी व्यक्त केली. आता लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून येथे ओबीसींची आंदोलन झाली.

या मतदारसंघात ओबीसी आणि आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आहे. तत्पूर्वी लोकसभेतील धानोरकरांच्या विजयानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातसुद्धा ओबीसी कार्ड चालले. भाजपच्या दोन्ही हक्काच्या जागा काँग्रेसने हिसकावून घेतल्या. ओबीसी या मतदारसंघात जयपराजयाचे गणित ठरवू शकते, याची जाणीव भाजपला आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातसुद्धा ओबीसी चेहरा हवा, असा निष्कर्ष आल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चा आहे. मात्र दिल्लीत जाण्यासाठी ते फारसे इच्छुक नाही, असे समजते. अहीर यांचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद देवून पुर्नवसन केले. मात्र अहीर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तेसुद्धा ओबीसी आहेत. दुसरीकडे मुनगंटीवार यांनीही कार्यक्रमांचा सपाटा सुरु केला असून लोकसभेची सुत्र आपल्याच हाती असल्याचे चित्र निर्माण केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामाजिक समीकरणात आणि सर्व गटांना चालणारा उमेदवारांचा शोध भाजपकडून सुरु आहे. हा शोध सध्यातरी माजी आमदार संजय धोटे यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. सन २०१९ विधानसभा निवडणुकीत धोटे यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात पक्षाकडून विचारणा झाली आहे, असे धोटे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जिवतोडे यांचेही नाव या यादीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपचे धक्कातंत्र बघता या व्यतिरिक्त आणखी एखादा नवा चेहरा लोकसभेच्या मैदानात दिसू शकतो.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com