गद्दारी महागात पडणार; काँग्रेसची साथ देणाऱ्या पाच सदस्यांना भाजपने पकडले खिंडीत

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये फुट पडली.
BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये फुट पडली. माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील पाच जणांनी बंडखोरी करत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजपचा पराभव झाला. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून या बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. (BJP Latest Marathi News)

निवडणुकीत भाजपमधील गटबाजी उफाळून आली होती. वाघमारे यांच्या गटाने उघडपणे काँग्रेसला मदत केली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, दिलीप सार्वे, धुरपता मेहर, उमेश पाटील या भाजपच्या सदस्यांनी पक्षाचा व्हीप जुगारून काँग्रेसला मदत केली. त्यानंतर भाजपने वाघमारे यांच्यासह पाचही जणांना पक्षातून निलंबित केले आहे. (Congress Latest Marathi News)

BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? नवनीत राणांची पंचाईत, व्हिडीओ व्हायरल

पाचही जण भाजप तिकीटावर निवडून आलेले असल्याने या सर्व सदस्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी याचिका भाजपच्या वतीने ॲड. राहुल देवगड़े यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या पाच सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या याचिकेवर जिल्हाधिकारी लवकरच पाचही सदस्यांना नोटीस बजावणाऱ असून पाचही जणांचे सदस्यत्व रद्द होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काय घडलं निवडणुकीत?

चरण वाघमारे व विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या गटात चढाओढ निर्माण झाली होती. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता पक्ष श्रेष्टींनी बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्रे दिली होती. बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेताच वाघमारे यांना फोन केले. मात्र, त्यांनी भाजपने राष्ट्रवादीसोबत जाऊन नये असे स्पष्ट केल्यामुळे बावनकुळे यांना वाघमारे यांचे मन वळवण्यात यश आले नाही. परिणामी निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत जात उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
आमदार गोरे यांना आजही दिलासा नाही; न्यायालयाने निकाल राखून ठेवला

वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागलेे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com