Lok Sabha Election 2024 : दक्षिणेतील ‘सूर्या’ करणार भाजपचा युवा आणखी ‘तेजस्वी’

Tejasvi Surya : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरात देणार तरुणाईच्या निवडणुकीपूर्वी टीप्स
Tejasvi Surya.
Tejasvi Surya.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : भारत सर्वाधिक तरुणाई असलेला देश असल्याचा उल्लेख वारंवार होतो. याच तरुणाईने केलेल्या मताधिक्क्याच्या आधारावर नरेंद्र मोदी यांना 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमताची सरकार देशात स्थापन करता आली. बघता बघता मोदी सरकारने सलग दोन टर्मही पूर्ण केल्या आहेत. अशात भाजपचे लक्ष्य विरोधकांना ‘टोटल स्वाइप आऊट’करण्याचे आहे. त्यामुळे भाजपने ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तरुण मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे यंदाही भाजपने युवा मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

भाजपची शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाला आता लोकसभा निवडणुकीपूर्वी सक्रिय करण्यात आले आहे. भाजपमधील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरण्यासाठी व याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी उपराजधानी नागपुरात सोमवार, 4 मार्च रोजी विदर्भातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या हे या मेळाव्यात युवा कार्यकर्त्यांना आणखी तेजपुंज करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tejasvi Surya.
Tejasvi Surya : 'वकील ते खासदार' तेजस्वी सूर्या...

तेजस्वी सूर्या यांच्या या महामेळाव्यासाठी नागपुरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण विदर्भातून भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात एकवटणार आहेत. नरेंद्र मोदी हा एकच ‘ब्रान्ड’ भाजपजवळ आहे. त्यामुळे अगदी 2014 पासून आतापर्यंत केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’ याच आधारावर भाजपकडून प्रचार केला जात आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, हरयाणा, सिक्कीम, त्रिपुरा अशा राज्यांचा भाजपने कसा विकास केला यासह अनेक मुद्द्यांवर खासदार तेजस्वी सूर्या हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

कलम 370 हटविण्यापासून अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणापर्यंत कोविड महासाथीपासून रशिया-युक्रेन युद्धापर्यंत भारताकडे जग विश्वगुरू म्हणून पाहात आहे. देश-विदेशातील तरुणाईही पुन्हा एकदा भारताकडे आकर्षित होत आहे. ‘मेक इन इंडिया’चा नारा आजही बुलंद आहे. ‘डिजिटल इंडिया’चा सकारात्मक परिणामही दिसत आहे. विदेशातील अवैध धनसंचय, सर्जिकल स्ट्राइक असे अनेक मुद्दे तरुणाईला भावले आहेत. असे सर्व मुद्दे देशातील तरुणांच्या मनात खोलपर्यंत बिंबविण्याचे कार्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि त्यांच्या ‘युवा वॉरियर्स’च्या माध्यमातून करणार आहे. नागपुरात आयोजित या मेळाव्यानंतर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये एक आगळेवेगळे परिवर्तन बघायला मिळेल व त्याचा आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होईल, अशी आशा भाजपला या आयोजनातून आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Tejasvi Surya.
Tejasvi Surya : दोन युवांची लढाई : आदित्य ठाकरेंवर उतारा म्हणून भाजपकडून 'तेजस्वी' मैदानात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com